खोपोली नगर परिषद निवडणुकीनंतर "केपी न्यूज चैनल"चे संपादक फिरोज पिंजारी यांना संपविणार..?

 माजी नगरसेवकासह राजकिय नेत्यांची मोर्चेबांधणी , विजयी रैलीतच संपूर्ण कुंटुंबाला मारण्याची सुपारी...?


प्रेस मीडिया लाईव्ह : 

सुनील पाटील :

खोपोली (जि. रायगड)  :- अन्याय अत्याचाराविरोधात लढणारे...खोपोली शहरासह खालापूर व रायगड जिल्ह्यातील भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविणारे दैनिक कोकण प्रजा, केपी न्यूज चैनल, कोकण प्रवाह & इंटरपोल वेब पोर्टलचे मुख्य संपादक...अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF)चे राष्ट्रीय उपाध्यक्ष... पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव फिरोज पिंजारी यांना जीवे मारण्यासाठी खोपोली शहरातील माजी नगरसेवकासह काही राजकीय नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून खोपोली नगर परिषद निवडणुकीनंतर 'या' कामाला पूर्णत्वास नेले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

खोपोली शहरात अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने दैनिक कोकण प्रजा, केपी न्यूज चैनल, कोकण प्रवाह & इंटरपोल वेब पोर्टलच्या माध्यमातून फिरोज पिंजारी आवाज उठवित असतात. प्रामाणिक व सच्चाई ने पत्रकारीता करीत असल्याने कुणाचीही भीड न ठेवता...अन्याय अत्याचाराविरोधात बातम्या प्रकाशित करीत असतात. मागील वर्षभरात काही नेते, लोकप्रतिनिधी व माजी नगरसेवक यांच्याविरोधात बातम्या प्रकाशित केल्याने आमदार व खासदार यांच्या जवळ असणाऱ्या माजी नगरसेवकासह राजकिय नेते, उद्योजक व कार्यकर्त्यांनी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) राष्ट्रीय उपाध्यक्ष... पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव फिरोज पिंजारी व अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) महाराष्ट्र राज्य महासचिव तथा पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा महासचिव खलील सुर्वे यांना जिवानिशी संपविण्यासाठी कटकारस्थान रचले आहेत. एका राजकिय पक्षांच्या नेत्याने यासाठी भाड्याने माणसे देखील बुक केले आहेत. ऐवढेच नव्हे तर नगरसेवकाच्या विजयी रैलीतच अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) राष्ट्रीय उपाध्यक्ष, पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव फिरोज पिंजारी यांच्या खोपोली सुभाषनगर येथील घरीच काही स्थानिक कार्यकर्त्यांसह भाड्याचे गुडं पाठवून त्यांना व त्याच्या पत्नीसह मुलाबाळांना संपविण्याची सुपारी राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक व त्यांच्या मुलांनी दिले आहे, यासाठी संबधितांच्या मोठ्या प्रमाणावर बैठका सुरू आहेत. स्थानिक कार्यकर्ते व फिरोज पिंजारी राहत असलेल्या परिसरातील काही नेते, कार्यकर्ते यांच्यासोबत कशा पध्दतीने हा खुनी खेळ  खेळायचा यावर चर्चा करण्यात आली असून यात दलित व अल्पसंख्याक समाजाचे काही नेते देखील सहभागी असल्याचे समजते. 

मागील अनेक वर्षापासून राजकीय बालेकिल्ला बनविलेल्या नेत्यांनी यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. राजकिय लागेबांधे व पैशांच्या जीवावर अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य महासचिव फिरोज पिंजारी, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य महासचिव तथा पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा महासचिव खलील सुर्वे, जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ, पत्रकार नरेश जाधव यांना समाजहितासाठी लढल्यामुळे तसेच खोपोली शहरातील नागरिकांच्या हितासाठी आवाज उठविल्या प्रकरणी...भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविल्यामुळे आयुष्यातून उठविण्यासाठी प्लॅनिंग करण्यात आले आहे. दिवालीतच या सर्वांना यमसदनी पाठविण्याचा विचार होता, पण खोपोली नगर परिषद निवडणुकीवर याचा परिणाम झाला असता, त्यामुळे खोपोली नगर परिषद निवडणुकीनंतर अर्थात निकालानंतर विजयी रैलीत स्थानिक युवकांसह भाड्याचे गुडं पाठवून खलील सुर्वे, हनुमंतराव ओव्हाळ, नरेश जाधव यांच्यासह फिरोज पिंजारी यांना त्यांच्या पत्नी व मुलाबाळांसह संपविण्याची सुपारी राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक व त्यांच्या मुलांनी दिली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post