सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज् ' ला अतुल्य सेवा सन्मान प्रदान

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पर्यावरण आणि शाश्वत विकास क्षेत्रात योगदानांबद्दल 'सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज् ' या संस्थेचा  ' अतुल्य सेवा सन्मान ' देऊन गौरव करण्यात आला.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पदमश्री  गिरीश प्रभुणे, विशेष पोलीस महासंचालक  कृष्ण प्रकाश, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक  शेखर मुंदडा, लोकमत चे संपादक  संजय आवटे, 'वनराई 'संस्थेचे   रवींद्र धारिया या  मान्यवरांच्या हस्ते  डॉ पूर्वा केसकर,  अमोल उंबरजे आणि सौ शिवाली वायचळ यांनी हा सन्मान स्वीकारला. स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमतचे संस्थापक -संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त  लोकमत व महा एनजीओ फेडरेशन यांच्या वतीने हा  कार्यक्रम  आयोजित  करण्यात आला होता. 

 ११ वर्षांपासून डॉ पूर्वा केसकर,  ह्रिषीकेश कुलकर्णी, सौ अनघा परांजपे पुरोहित, सौ अपूर्वा कुलकर्णी व  विजय साने यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण व शाश्वत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 'सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज् ' चा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम पत्रकार भवन या सभागृहात 2 जानेवारी 2023 रोजी झाला.

सन्मान स्वीकारण्यासाठी  हे उपस्थित होते. महाराष्ट्रातले अनेक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व प्रतिनिधी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post