वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील काही भागातील वीज पुरवठा खंडीत

 महावितरणने ठरवून दिलेले कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी विरोधात कडक कारवाई करण्यात येणार 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : वीज वितरणाच्या खाजगीकरणाला विरोध यासह इतर मागण्यांसाठी 3 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून राज्यातील 86 हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी व 42 हजार कंत्राटी कामगार सुरक्षारक्षकांनी 72 तासाचा संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल असा ईशारा दिला होता. अखेर राज्य सरकारने मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे संपकरी कर्मचारी आंदोलनावर ठाम असून राज्यातील जनतेला वीजे संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे.

30 संघटनांचे कर्मचारी संपात सहभागी : 

संपात राज्यातील 30 संघटनाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. संप काळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणने देखील कंबर कसली आहे. वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये त्यांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नाहीत तर जनतेच्या मालकीचा वीज उद्योग टिकला पाहिजे तो भांडवलदारांना विकता कामा नये, भांडवलदार नफा कमवण्याच्या उद्देशाने वीज वितरण क्षेत्रात येत असल्याचे सांगितले जात आहे. याकरिता खाजगीकरण विरोधात हा 3 दिवसाचे काम बंद आंदोलन वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे.

मेस्मा कायदा लागू : 

विजेची सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे त्यामुळे संबंधित सेवेतील कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याबाबत प्रतिबंध करण्यात आला असून ज्या सरकारने मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू केला आहे. महावितरणने ठरवून दिलेले कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

कोल्हापूरातील कार्यालयात शुकशुकाट : 

महावितरणच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचारी अधिकारी आजपासून 72 तासासाठी संपावर गेले आहेत. यामुळे कोल्हापुरातील महावितरणच्या कार्यालयात सकाळपासून शुकशुकाट पसरला असून कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी गेटच्या बाहेर येऊन अदानी समूह विरोधात आणि ऊर्जा मंत्र्यांविरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी करत आंदोलन करत आहेत. दरम्यान, या आंदोलनाला आता विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असून जिल्हात वीज देखील काही ठिकाणी खंडित झाल्याचे प्रकार समोर येत आहेत.

बीडमध्ये 700 पैकी 650 कामगार संपात सहभागी : 

बीड जिल्ह्यात एकूण 700 कामगार आहेत त्यापैकी 650 कामगार या संपामध्ये सामील झालेले आहेत. नवीन घेतलेले 46 कामगार फक्त कामावर आहेत. आऊटसोर्सिंग सहित संपावर आहेत, जवळपास परळी शहरातील 71% बंद झालेली आहे. माजलगाव तालुक्यातील जवळपास सर्वच बंद झालेली आहे, देवळा तालुक्यातील 11 सब स्टेशन बंद झाले आहेत. बीड तालुक्यातील नऊ स्टेशन बंद झाले आहेत. या सगळ्या ठिकाणी 72 तासाचा आमचा संप पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा कुठलाही कामगार कामावर रुजू होणार नाही, असे संपकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.उरणमधील वायू विद्युत केंद्रावर परिणाम : राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेल्याने उरणच्या वायु विद्युत केंद्रातील महाजनकोच्या वीज निर्मिती वर ही परिणाम झाला आहे. त्यामुळे उरण मधील वायु विद्युत केंद्रातील 50 मेगाव्याटचा सयंत्र बंद झाला आहे. परिणामी वायु विद्युत केंद्रातील २१० मेगाव्याट वीज निर्मिती 160 वर आली आहे. यामुळे सकाळी 5 वाजल्यापासुन वीज गायब झाली आहे. याचा फटका मात्र सामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना बसत आहे. उरणच्या वायु विद्युत केंद्रात २६७ कामगार कार्यरत आहेत. या संपात ३० कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत.

रत्नागिरीत 99 टक्के वीज कर्मचारी संपात सहभागी : जिल्ह्यातही वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे. 1539 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. म्हणजेच जवळपास 99 टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. प्रामुख्याने खाजगीकरणाला विरोध यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाचा ग्रामीण भागातील वीज वितरणावर परिणाम झाला आहे. लांजा शहरासह गुहागर शहर आणि ग्रामीण भागात बत्ती गुल झाली आहे. 2 सब स्टेशन आणि 8 फिडर बंद सध्या बंद असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, रत्नागिरीत ठिकठिकाणी महावितरणच्या कार्यालयाबाहेर संपकरी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली.


Post a Comment

Previous Post Next Post