सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात फिरण्यासाठी नावनोंदणी करावी लागणार..

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात सकाळी किंवा सायंकाळी व्यायाम अथवा फिरण्यासाठी जाण्याकरिता आता नावनोंदणी करावी लागणार आहे. विद्यापीठ आवाराच्या आणि तेथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठात सकाळी आणि सायंकाळी व्यायाम आणि विहारासाठी येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ही नोंदणी विनामूल्य असून नोंदणीसाठी विद्यार्थी सुविधा केंद्राजवळील सुरक्षा केबिनमध्ये व सुरक्षा विभाग या दोन ठिकाणी डेस्क ठेवून स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या डेस्कवर नोंदणी अर्ज ठेवण्यात आले असून, तो अर्ज भरून नागरिकांना त्याचठिकाणी जमा करायचा आहे. ही नोंदणी 28 जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या आवारात औंध, रेंजहिल्स, सांगवी, मॉडेल कॉलनी, पाषाण रस्ता भागांतून दररोज फिरणे आणि व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

विद्यापीठाच्या कार्यालयीन कामकाजाच्या आधी आणि नंतरच्या कालावधीत फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. विद्यापीठाच्या आवारात आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही नोंदणी करण्यात येत असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post