पिंपरी चिंचवड शहरात महाविद्यालयीन मुलींच्या गुलाबी टोळीची दहशतप्रेस मीडिया लाईव्ह :

 पिंपरी चिंचवड : औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात आतापर्यंत भाईगिरी करणाऱ्या गावगुंड मुलांची दहशत पाहायला मिळत होती. मात्र आता शहरात महाविद्यालयीन मुलींच्या गुलाबी टोळीची दहशत पाहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या या टोळीने शहरात धुमाकूळ घातला आहे. कॉलेज सुटल्यानंतर तरुणींचं हे टोळकं मुलींना मारहाण करत आहेत. या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. 

ज्या वयात महाविद्यालयीन  मुलींनी आपलं शैक्षणिक भविष्य घडवायला हवं, त्या वयात या मुली एकमेकांवर दगडफेक करून एकमेकांना दगडाने ठेचण्याचा प्रयत्न करत आहेत. आपआपसातल्या झालेल्या किरकोळ वादातून पिंपरी-चिंचवड  गावातील एका महाविद्यालयीन मुली अगदी बेभान होऊन एकमेकींना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तुडवत आहेत.

गुलाबी टोळीच्या मुली फक्त एकमेकींना मारहाणच करत नाही. तर त्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी मुलींना भररस्त्यात अडवतात आणि मारहाण करतात. काही दिवसांपूर्वी मुलींच्या या टोळक्याने एका मुलीला बेदम मारहाण केली होती. आता अशाच प्रकारचे काही व्हिडिओ ) समोर आले आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post