ग्रामपंचायत तारदाळ मध्ये गावसभा खेळीमेळीत व उत्साहात संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे 26 जानेवारी रोजीची गावसभा लोकनियुक्त सरपंच सौ.पल्लवी पोवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यामध्ये  विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे  ठराव मंजूर सर्वानुमते करण्यात आले. त्यामध्ये   तारदाळ येथे परमिट रूम, बियर बार, बिअर शॉपी, अशा कोणत्याही मद्याच्या   व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचा ठराव न देण्याचा  सर्वानुमते ठराव करण्यात आला. तसेच अवैधरीत्या चालविण्यात येणाऱ्या  गावठी दारूचे अड्डे हद्दपार करण्याचाही ठराव करण्यात आला. 


त्याचबरोबर    तारदाळ येथे इलेक्ट्रिक सबस्टेशन करण्यासाठी Mseb साठी  जागेची पाहणी करून एक एकर जमीन भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव करण्यात आला. त्याचबरोबर अपंग मूकबधिर शाळेसाठी ही जागा आरक्षित ठेवण्याचा ठराव करण्यात आला. गायरान मधील अतिक्रमणे काढण्याचाही ठराव करण्यात आला. दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी यांना दिलेली जागा ग्रामपंचायत ताब्यात घेण्याचा व येथून पुढे दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी यांना गायरान जागेसंबंधी कोणताही ठराव न करण्याचा ठराव करण्यात आला.स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध झाल्यास जावईवाडीतील स्मशानभूमी  हटवण्याचाही ठराव करण्यात आला.  तसेच भारत निर्माण नळपाणी पुरवठा थकीत पाणीपट्टी धारकांचे नळ कनेक्शन कट करणेबाबतचा ठराव करण्यात आला तसेच भारत निर्माण नळपाणी पुरवठा मध्ये झालेल्या भ्रष्टाचार वसुली बाबतीत किरकोळ वाद वगळता तारदाळ मधील गावसभा  उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली. 

याप्रसंगी  गावसभेला ग्रामसेवक बाबासाहेब कापसे, सचिन पवार ,विनोद कोराने, रणजीत पवार, अंजना शिंदे, प्रवीण पाटील, मृत्युंजय पाटील ,चंद्रकांत तांबवे ,सुरज कोळी, नितीन खोचरे,सूर्यकांत जाधव, विमल पवार,संगीता पाटील, सुवर्णा दाते प्रवीण केर्ले ,सुदाम भुयेकर ,कैलास कांबळे,  दादासो सुतार, प्रल्हाद माने , यांचेसह तारदाळ मधील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते .

Post a Comment

Previous Post Next Post