मेन राजाराम हायस्कूल मध्येक्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली
प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर : मेन राजाराम हायस्कूल मध्ये दिनांक 03 जानेवारी 2023 रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती  साजरी झाली. शाळेची पटसंख्या ही शाळेत राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांना न्याय देत नसली तरी येथील उत्साह व उमेद  कमी नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन पेठ वडगाव येथून आंतरवासिता प्रात्यक्षिकासाठी आलेल्या छात्राध्यापक गटातील छात्राध्यापकाने पार पाडली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. 

शाळेतील विद्यार्थ्यांनी 'मी सावित्री' आणि 'मी ज्योतीराव' या विषयावर त्यांची वेषभूषा करून वक्तृत्व पार  पडले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नाईक एस. एस. यांचे अध्यक्षीय मनोगत पार पडले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  आणि श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन पेठ वडगाव येथून आंतरवासिता प्रात्यक्षिकासाठी आलेल्या कॉलेज  ऑफ एज्युकेशन पेठ वडगांव च्या प्राचार्य व आंतरवासिता गटाच्या मार्गदर्शिका सौ. निर्मळे आर. एल , छात्रमुख्याध्यापिका सौ. नामे व्ही. डी व इतर छात्रध्यापक कु.कुलकर्णी .पी .पी , कु.पाटील .एस .बी,  कु. वड्डर ए. एस, कु. पाटील .एस.डी,सौ पाटील. पी . एस मॅडम व कु कापडे. ए.के सर व सर्व विद्यार्थी कार्यक्रमास उस्फूर्तपणे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post