पुढील काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) एकत्रितपणे निवडणुकीची तयारी करु...शरद पवार

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर- आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना, त्यांनी  पत्रकार परिषद घेत विरोधकांचा तसेच राज्यपालांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आगामी काळात एकत्रितपणे निवडणुकीची तयारी करेल, तसेच पुढील काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) एकत्रितपणे निवडणुकीची तयारी करु, असं देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर खोचक टिका केली.

राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे : 

दरम्यान, मागील काही काळापासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भलतेच चर्चेत आहेत. जनतेतून टिका होणारे पहिलेच हे राज्यपाल असतील, असं पवार म्हणाले. राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, राज्यपाल नाखूश असतील. तर, आम्ही देखील नाखूश तसेच महत्त्वाच्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे, असं पवार म्हणत राज्यपालांवर टिका केली.

कडवा शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबतच.

शिंदे गटाने शिवसेनेतून बंड केल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे, अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र कडवा शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबतच आहे, असं पवार म्हणाले. यावेळी त्यांनी आगामी काळात मविआ एकत्रितपणे निवडणुकीची तयारी करणार, सत्ता असली तरी, पाय जमिनीवर हवेत असा टोला देखील शिंदे-फडणवीस सरकारला हाणला.

भारत जोडो यात्रेचा परिणाम दिसेल.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेचा परिणाम दिसेल, राहुल गांधींची खिल्ली उडविली जाते, मात्र याचा परिणाम भविष्यात दिसेल, असं पवार म्हणाले..

म्हणून राम मंदिराचा मुद्दा पुढे

सध्या अनेक वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चा केली होत आहे. यामुळं मूळ प्रश्न बाजूलाचा राहताहेत. सध्या खऱ्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे करण्यात आलाय. अशी टिका शरद पवार यांनी भाजपाच्या केंद्र सरकारवर केली

मला माहित नाही

हे सरकार फेब्रुवारीमध्ये कोसळणार असं संजय राऊत बोललेत यावर बोलताना पवार म्हणाले की, याबाबत मला फारसं काही माहित नाही, असं पवार म्हणाले. जाणता राजाबाबत वाद करण्यात काही अर्थ नाही. जातीनिहाय जनगणना ही मागणी आमची आधीपासून आहे. असं पवार म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post