जयसिंगपूर नगरपरिषदे कडून महिला बचत गटांना बीज भांडवल व फेरीवाल्यांना परिचय बोर्डांचे वाटप



प्रेस मीडिया लाईव्ह : 

जयसिंगपूर : राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटांसाठी विविध योजना राबविण्यात येतात, काही महिला बचत गटांना घरगुती व्यवसाय करण्यासाठी भांडवल नसल्यामुळे त्यांना व्यवसाय करणे शक्य होत नाही, बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उद्योगांना मदत व्हावी म्हणून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया ही योजना सुरू केली आहे, यातील स्वयंसहाय्यता बचत गटा अंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योगांना बळकटीकरण करण्यासाठी बीज भांडवल योजना वरदान ठरणारी आहे, हे बीज भांडवल संपूर्ण अनुदान स्वरूपात असून लाभ घेणाऱ्या गटासाठी वार्षिक सहा टक्के व्याजदराने कर्ज स्वरूपात देण्यात येते, ही योजना पापड उद्योग, लोणचे उद्योग, शेवया, चटणी, मसाले पदार्थ, बेकरी पदार्थ तयार करीत असलेल्या बचत गटांसाठी उपयुक्त आहे, 

जयसिंगपूर नगरपरिषदे अंतर्गत शहरातील दोन बचत गटांना एकूण रक्कम रुपये २.६००००/-दोन लाख सात हजार रुपये इतके कर्ज मंजूर झाले असून या रकमेचे धनादेश जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी तैमूर मुलाणी त्यांच्या हस्ते देण्यात आले, याचबरोबर राष्ट्रीय नागरिक अभियान उपजीविका अभियान अंतर्गत फेरीवाल्यांना सक्षम करण्यासाठी खेळते भांडवल म्हणून कर्ज देणे शासनाच्या वतीने सुरू आहे, या योजने अंतर्गत दहा हजार, वीस हजार व पन्नास हजार असे तीन टप्प्यात कर्ज दिले जाते, जयसिंगपूर नगरपरिषद 2020 पासून ही योजना राबवत आहे, याचे शहरात ४०४ लाभार्थी आहेत, या फेरीवाल्यांसाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या 248 परिचय बोर्डाचे वाटप देखील याच कार्यक्रमात करण्यात आले, विजयालक्ष्मी महिला बचत गटातील महिला व या योजनेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी शुभांगी देशमुख व समुदाय संघटक मेघा खामकर यांच्यासह फेरीवाले व्यावसायिक व मान्यवर उपस्थित होते,

Post a Comment

Previous Post Next Post