पंचगंगा नदी किनारी श्री वरविनायक मंदीरात गणेश जयंती उत्साहात पार पडली



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी :  पंचगंगा नदी किनारी श्री वरविनायक मंदीरात गणेश जयंती उत्साहात पार पडली इचलकरजी महानगर पालिकेचे उपआयुक्त श्री डाॕ प्रदिप ठेंगल यांच्या शुभ हस्ते श्री वरद विनायकाची विधिवत पूजा करण्यात आली. तर सकाळी  श्री व सौ चंद्रकांत मिटारी  यांच्या हस्ते श्री वरद विनायकाला अभिषेक करण्यात आला.

 इचलकरंजी  येथील पंचगंगा वरदविनाक मंदिरात गणेश जन्मसोहळा, पाळणागीत आदी कार्यक्रमांनी आणि गणेशभक्‍तांच्या साक्षीत गणेश जयंती पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गणेशभक्‍तांनी उत्सवात सहभागी होताना पाळण्यातील बाल गणरायाचे दर्शन घेऊन श्रींच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. विविध धार्मिक विधी पार पाडण्यात आले. द्राक्षांचे घड लावून आणि विविध फळांची आकर्षक आरास मांडून वरदविनायकाची सजावट करण्यात आली.* 

*शहरातील नदी किनारी श्री वरदविनाक गणपती मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाईत धार्मिक कार्यक्रमांसाठी सज्ज करण्यात आले होते. आज दुपारी विविध गणेश मंदिरांत* *विधिवत पद्धतीने गणेश जन्मोउत्सव  सोहळा साजरा करण्यात आला. तसेच गणेश याग, श्री अभिषेक, पंचामृत आरती, प्रदक्षिणा, गणेश आरती असे धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. जयंतीच्या पूर्वसंध्येला* *विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाले होते.  भाविकांची सकाळपासूनच मंदिरात रेलचेल सुरू होती. जन्मकाळ साजरा झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.* *विविध फळांच्या सजावटीमुळे वरदविनायकाचे रूप अधिकच खुलले. याठिकाणी महिलांनी* *मोठी गर्दी केली. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार व मोदक तीळाचे लाडु अर्पण करून भाविकांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, मंडळाचे उपाध्यक्ष श्री* *बाळासाहेब जांभळे, माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे,  नगरसेविका सौ कलावती  जांभळे ,द्वारकाधीश सारडा, प्रकाश कलागते, हणमंत वाळवेकर,  शिवबसु खोत*, *मुळचंद नानावटी, विषणु शिंदे ,शितल पाटील, विनायक रेडेकर, सुनील ताडे, विश्वनाथ मेटे, गजानन स्वामी, राजु तलंदगे,मोहन नाझरे, प्रितंम पोटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित  मंदिर भक्त मंडळ होते.*

Post a Comment

Previous Post Next Post