संपादक फिरोज पिंजारी यांना जीवे मारण्याचा कट करणाऱ्यांची नावे पाठवित कार्रवाई करण्याची मागणी

 महामहीम राष्ट्रपतींसह पीएमओ, गृह मंत्रालय व ह्युमन राईट्स कडे 'एबीजेएफ' राष्ट्रीय अध्यक्ष यांची तक्रार


प्रेस मीडिया लाईव्ह :

हैद्राबाद / प्रतिनिधी :- अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा दैनिक कोकण प्रजा, केपी न्यूज चैनल, कोकण प्रवाह & इंटरपोल वेब पोर्टलचे संपादक फिरोज पिंजारी तसेच अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य महासचिव खलील सुर्वे व राज्य सचिव नरेश जाधव यांना जीवे मारण्याचा कट खोपोली शहरातील माजी नगरसेवकासह काही राजकीय नेत्यांनी रचला आहे. दरम्यान, या प्रकरणी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) आक्रमक झाली असून राष्ट्रीय अध्यक्ष राजेश जी यांनी महामहीम राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह निवडणूक आयोग, मानवाधिकार आयोग (ह्युमन राईट्स विभाग), अल्पसंख्याक आयोग व ईडीकडे कार्रवाईची मागणी करण्यात आली आहे.

अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, महाराष्ट्र राज्य महासचिव खलील सुर्वे व राज्य सचिव नरेश जाधव यांच्यासह जेष्ठ पत्रकार पैलवान हनुमंतराव ओव्हाळ हे समाजासाठी लढत आहेत…लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत… नगरसेवक प्रभागाचा विकास करीत नसल्याबाबत बातम्या प्रकाशित करीत आहेत, यामुळे त्यांना जीवे मारण्याचा कट रचत आहेत. खोपोली नगर परिषद निवडणुकीनंतर हा खुनी हल्ला खेळण्याचा कट रचण्यात येत असून या कटात सामील असलेले नगरसेवक, राजकिय नेते, उद्योजक व त्यांचे कार्यकर्ते अशा जवळजवळ 15 ते 20 लोकांची नावे व या कटाचा मास्टरमाइंड स्वत:ला परिसराचा अनभिषिक्त सम्राट समजणाऱ्या नेत्याचे नाव महामहीम राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते, गृहसचिव, पोलीस महासंचालक, रायगड पोलीस अधिक्षक, रायगड जिल्हाधिकारी, मानवाधिकार आयोग (ह्युमन राईट्स विभाग) यांच्याकडे पाठवित आले आहे.

दरम्यान, संपादक फिरोज पिंजारी, पत्रकार नरेश जाधव, खलील सुर्वे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांसोबत काहीही घातपात झाल्यास त्याची सर्व जबाबदारी या लोकांची असेल तसेच यापुढे या अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे पदाधिकारी व पत्रकार यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असेल, असे अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश जी यांनी निवेदनात म्हटले आहे. जर फिरोज पिंजारी, नरेश जाधव, खलील सुर्वे यापैकी कुणाचाही जीव गेल्यास संबधित सर्वांवर भांदवि कलम 302 प्रमाणे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रैक न्यायालयात चालविला जावा, अशी मागणी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश जी यांनी महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे.

याच प्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे देखील नगरसेवकांची नावे पाठविण्यात येत असून जर अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य महासचिव खलील सुर्वे व राज्य सचिव नरेश जाधव यांच्यासोबत घातपात झाल्यास या नावातील जे निवडणूक लढतील किंवा निवडणूक जिंकून येतील त्याचे नगरसेवक पद तत्काळ गोठवित त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.

ऐवढेच नव्हे तर या नावापैकी अनेकांची आर्थिक परिस्थिती 15-20 वर्षापूर्वी अत्यंत हलाखीची होती मात्र सत्तेच्या बळावर यांनी अमाप पैसा कमावला असून या सर्वांच्या संपत्तीची चौकशी ईडीने करावी. तसेच मागील पाच वर्षात खोपोली नगर परिषदेत या लोकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फंत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे, असे अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश जी यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post