कर्जत कळंबोली येथील अल्पवयीन आदिवासी मुलगी चार महिन्यांची गरोदर

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

  सुनील पाटील :

    कर्जत तालुक्यातील कडाव जवळील कलम्बोली येथील आदिवासी वाडी मध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या घरी येऊन शारीरिक सम्बंढ़ ठेवणाऱ्या तरुणांमुळे ती मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली आहे. या प्रकाराबद्दल कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून सदर अल्पवयीन मुलगी रुग्णलयात उपचार घेत आहे.  

    कलम्बोली येथील आदिवासी वाडी मधील १४ वर्षे ६ महिने वर्षाच्या मुलीच्या घरी रात्री येत असे आणि दमबाजी करून शारीरिक संबंध ठेवत असे. सप्टेंबर २०२२ पासून त्या तरुणाकडून त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत होता.मात्र मासिक पाळी बंद झाल्याने तिच्या घरच्यांनी त्या अल्पवयीन मुलीला खासगी रुग्णालयात तपासणी साठी नेले असता ती मुलगी गरोदर असल्याचे डॉक्टारांनी सांगितले. त्यानंतर पालकांनी त्या अल्पवयीन मुलीला अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. त्याबाबत कर्जत पोलीस ठाणे यांना सामान्य रुग्णालयाकडून माहिती देंण्यात आल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्या अल्पवयीन मुलीचा जबाब घेतला आणि नंतर कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला.

     मुलीच्या  घरामध्ये कोणी नसताना रात्री अंधाराचा फायदा घेत वेळोवेळी अल्पवयीन मुली सोबत शरीर संबध केल्याने सदर अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली आहे.याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.05/2023 भा.द.वि.क 376,376(2),(n), बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम 2012 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक के डी कोल्हे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post