पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांना न्यायालयाचा दणका ..

राजकीय व्यक्‍तींचे फोन टॅप केल्याप्रकरणी दाखल केलेला क्‍लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे – पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांना न्यायालयाने दणका दिला आहे. राजकीय व्यक्‍तींचे फोन टॅप केल्याप्रकरणी दाखल केलेला क्‍लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे शुक्‍ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने हे क्‍लोजर रिपोर्ट दाखल केले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला हा दणका आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा रिपोर्ट फेटाळला.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण विभागाचे राज्य मंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी शुक्‍ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे पोलिसांकडून न्यायालयात क्‍लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू होता. या प्रकरणात तत्कालीन तांत्रिक विश्‍लेषण विभागाचे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली होती. शुक्‍ला या पोलीस आयुक्‍त असताना त्यांच्या कालावधीतच हे प्रकरण घडल्याने, त्यावेळी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची देखील चौकशी करण्यात आली होती. त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला होता. यावेळी चौकशी दरम्यान गुन्हे शाखेने फोन टॅपिंग कोणाच्या सांगण्यावरून केले, कोणत्या स्वरूपाची माहिती गोळा केली या आणि अशा स्वरूपाची माहिती यावेळी घेण्यात आली.

समितीच्या अहवालानंतर गुन्हाराज्यात देवेंद्र फडणवीस सरकार होते. त्यावेळी राजकीय नेत्यांचे फोन टॅप करून याबाबतची माहिती सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post