विधिमंडळाच्या परिसरातील स्वच्छतेसाठी योग्य खबरदारी घ्या - उपसभापती डॉ. नीलम गो-हे

 विधानपरिषदेत दिल्या स्वच्छतेबाबतचे दक्षतेचे निर्देश.



प्रेस मीडिया लाईव्ह :

नागपूर, 22 डिसेंबर  : विधीमंडळ परिसरातील वॉशरूममध्ये चहाचे कप धुतल्या जात असल्याबद्दल चौकशी करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी गुरुवारी दिल्या. तसेच काचेच्या कपांऐवजी कागदी कप वापरले जावेत असे निर्देश देखील गो-हे यांनी दिले.आमदार निवासातील अस्वच्छतेबाबत अमोल मिटकरी यांनी मुद्दा उपस्थीत केल्यानंतर उपसभापतींनी उपरोक्त सूचना केल्यात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवास परिसरात कंत्राटदाराकडून अन्नाची भांडी स्वच्छतागृहाच्या पाण्याने धुतल्याचा मुद्दा मांडला. तसेच यांसदर्भातील व्हिडीओचा पेनड्राईव्ह त्यांनी सभागृहात सादर केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की हा विषय गंभीर असून संबंधित दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले. त्यांनंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी सदर प्रकरणावर चिंता व्यक्त केली. तसेच विधीमंडळ परिसरात आजपासून काचेचे कप वापरू नये तर त्याऐवजी कागदाचे कप वापरावेत. कोरोना साथरोगाच्या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता काचेची भांडी आणि कपांऐवजी सर्व सदस्यांनी कागदी कपात चहा घ्यावा अशा सूचना उपसभापतींनी दिल्या.

त्यासोबतच आ. मिटकरी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जावी असेही उपसभापतींनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post