दिल्ली महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर पुण्यामध्ये आपच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर जल्लोष



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : दिल्ली महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीची सलग पंधरा वर्षाची सत्ता खंडित करून आम आदमी पार्टी स्पष्ट बहुमताने निवडून आली आहे. या निकालामुळे आम आदमी पार्टीच्या पुणे शहरातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. आम आदमी पक्षाच्या या ऐतिहासिक विजयानंतर नाना पेठ येथील कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला. पेढे, मिठाई यांचे नागरिकांमध्ये वाटप करण्यात आले. त्यानंतर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. नाना पेठ कार्यालय येथून सुरू झालेली बाईक रॅली --- लक्ष्मी रोड --- अलका चौक --- टिळक रोड --- अभिनव चौक --- बाजीराव रोड -- शनिवार वाडा --- मॉडर्न कॅफे --- जंगली महाराज रोड --- एफ सी रोड --- मार्गे फर्ग्युसन महाविद्यालय येथे रॅलीची सांगता झाली.



 यावेळी बोलताना *आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार* म्हणाले की,  "आज आम आदमी पक्षाने दिल्लीत ऐतिहासिक विजय प्राप्त केला. पक्षाने चांगल्या जागा तर मिळवल्याच परंतु याबरोबरच लोकांच्या मनातही जागा मिळवली असल्याचे या विजयाने सिद्ध केले.सर्व अडथळे पार करत पक्षाने हा विजय मिळवला असल्यानेही त्याचे महत्व जास्त आहे. या विजयासाठी अपार कष्ट उचलणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 17 केंद्रीय मंत्री, आठ मुख्यमंत्री व शेकडो खासदार अशी भली मोठी फौज आणि पैसा, मीडिया यांचा अमर्याद वापर याद्वारे भाजपने आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु अरविंद केजरीवालांच्या दिल्ली मॉडेल वर खुश असलेल्या दिल्लीकरांनी आपला भरघोस मतदान करून विजयी करून दिले."

यावेळी बोलताना *आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटन मंत्री अभिजीत मोरे* म्हणाले की, "केंद्र सरकारने उभ्या केलेल्या अनेक अडथळ्यांना फार करत आम आदमी पक्षाने मोठ्या जिद्दीने दिल्ली महानगरपालिकेमध्ये विजय मिळवला व १५ वर्षे सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला पराभवाची धूळ चारली. दिल्लीतील तीन महानगरपालिकांचे एकत्रीकरण करणे, निवडणुका अनियमित काळासाठी पुढे ढकलून वार्ड रचना बदलणे आणि गुजरात व हिमाचलच्या निवडणुकांसोबतच दिल्लीत महानगरपालिकेच्या निवडणुका लावून आम आदमी पक्षाची कोंडी करण्याची कपटनीती भारतीय जनता पक्षाने अवलंबली होती. आपच्या अनेक प्रमुख नेत्यांवर खोटे आरोप करून त्यांना अटक करणे, त्यांच्यावर धाडी टाकणे, त्यांना धमकावणे असे दहशतीचे प्रकार देखील भाजपने करून बघितले. परंतु या सर्व दमननीतीला आम आदमी पक्ष पुरून उरला. हा दिल्लीतल्या जनतेचा ऐतिहासिक विजय आहे. "



Post a Comment

Previous Post Next Post