जिजामाता रुग्णालय मध्ये अनागोंदी गैरकारभार बाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना आजाद समाज पार्टी तर्फे निवेदन

 29 तारखेला रूग्णालय प्रशासन विरोधात आजाद समाज पार्टीतर्फे आंदोलनाचा इशारा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

  अन्वरअली शेख :

पिंपरी येथील जिजामाता रुग्णालया मध्ये रुग्णांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष पिंपरी चिंचवड शहरातील आजाद समाज पार्टी तर्फे आज पिंपरी चिंचवड वैद्यकीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे,

जिजामाता रुग्णालयातीलकर्मचारी हे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना अपमानास्पद बोलणे, अंगावर खेकासने अशा प्रकारे दुय्यम दर्जा-ची वागणूक देतात,  डॉक्टर सुद्धा वेळेवर उपस्थित नसतात, आणि अतिशय धक्कादायक कृत्य कंपाउंडर व नर्सेस याच रुग्णांच्या केस हाताळत असतात. जर एखाद्या रुग्णाला काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण? रुग्णांना डॉक्टरांच्या प्रतीक्षेत तास्नतास ताटकळत बसावे लागते, रुग्णालयातील ज्या गोळ्या-औषधे उपलब्ध असतात त्या सुद्धा रुग्णांना नाकारल्या जातात व बाहेरून घ्या असे सांगितले जाते,गरीब रुग्णांना आरेरावीची अर्वाच्य भाषा वापरत दमदाटी करतात, अनेक लोकांना त्यांचा त्रास आहे म्हणून सदर कॉन्ट्रॅक्टर व त्यांचे कर्मचारी व बेशिस्त महानगरपालिका कर्मचारी यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करण्यात यावी अन्यथा आजाद समाज पार्टी तर्फे येत्या २९ तारखेला  रूग्णालय प्रशासन व महानगरपालिका वैद्यकीय विभागा विरोधात  मोठ्या प्रमाणात जन-आंदोलन उभारण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले जे वैद्यकीय विभागाचे प्रशासन अधिकारी  घुले सर यांनी स्वीकारत कारवाई चे आश्वासन दिले...

त्यावेळी रहीमभाई एम. सय्यद, शहर अध्यक्ष ,अनिताताई रिड्लान महिला शहराध्यक्ष , पिंपरी-चिंचवड शहर आजाद समाज पार्टी, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



      

Post a Comment

Previous Post Next Post