पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी गुगल मॅपद्वारे निगराणी ठेवण्यास सुरुवात केलीप्रेस मीडिया लाईव्ह : 

पठाण एम एस : 

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी गुगल मॅपद्वारे निगराणी ठेवण्यास सुरुवात केली आहे.पिंपरी-चिंचवड परिसरात चाकण, भोसरी, तळेगाव, चिंचवड औद्योगिक क्षेत्रे आहेत. हिंजवडी, तळवडे ही आयटी पार्क आहेत. देहूगाव, आळंदी ही तीर्थक्षेत्रे आहेत. तसेच परिसराचा विकास झपाट्याने होत असल्याने अनेकजण सार्वजनिक वाहतूक सेवेतील वाहनांचा वापर न करता खासगी वाहनांचा वापर करतात. खासगी वाहनांमध्ये वाढ झाल्याने पीक अवरमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते. शहरात स्मार्ट सीटीअंतर्गत शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जात असून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई देखील केली जाते.

चौकांमधील सीसीटीव्हीद्वारे काहीच अंतर निगराणीत येत असून वाहतूक कोंडी होणाऱ्या मार्गांची माहिती पोलिसांना मिळत नाही. त्यावर तोडगा काढत पोलिसांनी वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात मोठ्या स्क्रीन बसवल्या असून गुगलमॅपद्वारे त्यावरून पीक अवरमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवले जात आहे. ज्या मार्गावर वाहतूक कोंडी असेल त्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

नियंत्रण कक्षातून वाहतूक कोंडी असणाऱ्या चौकांमधील वाहतूक पोलिसांशी वायरसेल यंत्रणेवरून संपर्क करतात. चौकांमधील पोलीस तात्काळ पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून शहरातील वाहतूक सुरळीत करतात. गुगलमॅप द्वारे वाहतुकीवर निगराणी ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूकही करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post