महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिल्लीतही पोहोचला

 महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.


प्रेस मीडिया लाईव्ह :

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिल्लीतही पोहोचला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटले. त्यानंतर महाराष्ट्रातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीच्या आधी शाह यांच्या दालनाबाहेर राजकीय नाट्य बघायला मिळालं. त्यामुळे शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना दालनाबाहेरूनच माघारी फिरावं लागलं.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ऐरणीवर आला. बोम्मईंच्या विधानानंतर सीमावादाचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. खासदार सुप्रिया सुळे, खासदार विनायक राऊत यांनी या मुद्द्याकडे केंद्राचं लक्ष वेधलं. तसेच संसदेबाहेर निदर्शनंही केली.

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर निर्माण झालेला तणाव आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्राने लक्ष घालावं या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार या भेटीवेळी सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाच्या खासदारांनाही येण्याची विनंती केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : अमित शाह यांच्या दालनाबाहेर काय घडलं...?

अमित शाहंच्या भेटीला जाताना खासदार सुप्रिया सुळेंनी शिंदे गटाच्या दोन खासदारांनाही सोबत येण्याचं आवाहन केले. सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाच्या खासदारांना तुम्हीही सोबत चला असं म्हटलं. त्यावेळी खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे होते. ते दोघेही त्यांच्यासोबत यायला तयार झाले.दोघेही जेव्हा अमित शाहंच्या दालनापाशी पोहचले, त्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी त्यांना पाहून आक्षेप घेतला. हे येत असतील तर आम्ही सोबत येणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली. त्यामुळे खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे या दोन खासदारांना गृहमंत्र्यांच्या दालनाबाहेरूनच परत फिरावं लागलं.

दरम्यान, या प्रकारावर बोलताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं की, 'गेले दोन दिवस आम्ही सीमाभागातील कानडी अत्याचाराविरुद्ध संसदेत आवाज उठवत असताना शिंदे गटाचे खासदार गप्प बसले होते. त्यावेळी त्यांना महाराष्ट्राची एकी असायला हवी असे वाटले नाही. मग आता शाह यांच्याकडे चमकोगिरी करायला ते येणार असतील तर त्याला आम्ही आक्षेप घेणारच", अशी भूमिका विनायक राऊत यांनी मांडली.

 अमित शाह यांनी खासदारांना काय सांगितलं..?

अमित शाह यांच्या भेटीनंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या घडामोडींची माहिती अमित शाह यांना दिली. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की गुजरातचा शपथविधी झाल्यानंतर काहीतरी मार्ग काढतील. त्यामुळे माझा विश्वास आहे की, या प्रकरणात लवकरात लवकर केंद्राचा हस्तक्षेप होईल", असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

अमित शाहंच्या भेटीला जाताना खासदार सुप्रिया सुळेंनी शिंदे गटाच्या दोन खासदारांनाही सोबत येण्याचं आवाहन केले. सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाच्या खासदारांना तुम्हीही सोबत चला असं म्हटलं. त्यावेळी खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे होते. ते दोघेही त्यांच्यासोबत यायला तयार झाले.

दोघेही जेव्हा अमित शाहंच्या दालनापाशी पोहचले, त्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या खासदारांनी त्यांना पाहून आक्षेप घेतला. हे येत असतील तर आम्ही सोबत येणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली. त्यामुळे खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे या दोन खासदारांना गृहमंत्र्यांच्या दालनाबाहेरूनच परत फिरावं लागलं.

Post a Comment

Previous Post Next Post