मुंबई : पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी जमावबंदीचा आदेश लागू


प्रेस मीडिया लाईव्ह :

सुनील पाटील :

मुंबई : पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर रोजी रात्रीपर्यंत लागू असेल. पोलीस सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार काही कारणाने कायदा आणि सूव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. जमावबंदी असेल मात्र संचारबंदी नसेल. पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.


मुंबई पोलिसांनी 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत मुंबई शहरात कलम 144 लागू केलं आहे. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही. याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या मिशन विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितलं की, मुंबई शहरात 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत लाऊडस्पीकर, मिरवणूक आणि मेळावे घेण्यास बंदी आहे.

कलम 144 अंतर्गत 'या'वर बंदी

  • पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आहे.
  • मिरवणुकांवर बंदी असेल.
  • फटाके फोडण्यास मनाई आहे.
  • लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी.
  • मिरवणुकीत बॅण्डला मनाई आहे.
  • परवानगीशिवाय सामाजिक मेळावे करण्यास मनाई आहे.
  • आंदोलने/उपोषणास मनाई आहे.

Post a Comment

Previous Post Next Post