सावित्रीबाई फुले रुग्णालयात नवजात आयसीयु सेवा त्वरित सुरू करा

 रुग्णालयातील प्रश्नांवरील आढावा बैठकीत 'आप'ची मागणी.

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : महानगरपालिकेचे शहरी सार्वजनिक आरोग्य केंद्र म्हणून सावित्रीबाई फुले रुग्णालय कार्यरत आहे. प्रसूती, शल्यचिकित्सा, टीबी व लेप्रसी विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा दिली जाते. परंतु डॉक्टर व नर्सेसची अपुरी संख्या, एम बी बी एस डॉक्टर्सचा अभाव, एक्स-रे ऑपरेटर नसणे, सी एस आर फंडातून दिलेले फिल्टर मशीन बंद असणे, अस्वच्छता यासारख्या समस्यांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. 

या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या समस्या सोडवण्यासाठी उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी मानसेवी डॉक्टर्सच्या फिरतीचे नियोजन कालबद्ध असावे, डॉक्टर्स, नर्सेस, व ऑपरेटर्सच्या भरतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, रुग्णांना सेवा पुरवण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग द्यावे, पी आर ओ नेमण्यात यावा आदी मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या.

गरोदर स्त्रियांची प्रसूती वेळेआधी होणे, नवजात बाळाचे वजन दिढ किलोपेक्षा कमी राहिल्यास त्यांना निओ नेटल आय सी यु मध्ये (पेटीत) ठेवावे लागते. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास 8-10 हजार रुपये प्रतिदिन इतका भरमसाठ खर्च त्यावर होतो. ही गरज लक्षात घेत महापालिकेने एन आय सी यु सुविधा त्वरित सुरू करावी अशी मागणी 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केली. यावर प्रभारी आरोग्यधिकारी रमेश जाधव यांनी यासाठी ऐशी लाख रुपयांचे टेंडर काढले असून प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. 

सावित्रीबाई फुले रुग्णालय मॉडेल रुग्णालय करण्याच्या दृष्टीने कृती कार्यक्रम तयार करावा अशी मागणी 'आप' शिष्टमंडळाने केली. यावर दर पंधरा दिवसाला आढावा बैठक घेऊन कामकाज करण्यात येणार असल्याचे डॉ. पावरा यांनी सांगितले.

बैठकीस डॉ. प्रकाश पावरा, डॉ. रोहिदास, डॉ. हेरलेकर, डॉ. अमोल माने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा युवाध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, आदम शेख, दुष्यंन्त माने, विजय हेगडे, मयूर भोसले, उमेश वडर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post