शेतकरी पती पत्नीला मारहाण करून लुटमारप्रेस मीडिया लाईव्ह :

प्रतिनिधी राहुल सोनोने ( मळसुर)

मळसूर : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत  पांगरा चान्नी मार्गावरील पांगरा जवळ शेतकरी पती-पत्नीला मारहाण करून चाकूने जखमी करून लूटमार केल्याची घटना मंगळवार दि.२७ डिसेंबर रोजीच्या रात्री  ९:३० वाजताच्या सुमारास घडली, 

पांगरा येथील शेतकरी पती भास्कर श्रीराम इनस्कार,पत्नी गोदावरी बाई  भास्कर इनस्कार २७ डिसेंबर रोजीच्या रात्री ९:३० वाज्याच्या सुमारास  शेतात पिकावर राखण करण्यासाठी जात असताना, पांगरा जवळ अनोळखी चारजण मोटरसायकलवर आले आणि पती-पत्नीला चान्नी रस्ता विचारल्याचे सांगून मारहाण व चाकुने जखमी करून खिशातील ७०० रुपये,मोबाईल किंमत हजार रुपये व गळ्यातील नकली सोन्याची पोत लुटून दुचाकीवर चौघेजण पसार झाले, सदर घटने दरम्यान सावरगाव येथून चारचाकी दोन पत्रकार चान्नीकडे  येत असताना चारचाकी पाहून भीतीपोटी अनोळखी चौघेजण  दूचाकीवर बसून पळ काढला, पती-पत्नीने थेट चान्नी पोलीस स्टेशन गाठले भास्कर श्रीराम इनस्कार ५५ यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी अनोळखी चौघेविरुद्ध भादविच्या ३९४,३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार योगेश वाघमारे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post