कोविड काळातील विधवा महिलांचा आर्थिक पुरवठादार संस्थांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा.... उपसभापती डॉ. निलम गो-हेप्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई दि. ९ – कोविड काळात विधवा महिलांना बँकेच्या गृहकर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. ज्या महिलांना एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल, त्यांना संबंधित बँक, पतसंस्था, नागरी सहकारी संस्थांनी सहकार्य करावे. या महिलांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतिपूर्वक विचार करून निर्णय घ्यावेत; असे निर्देश उपसभापती डॉ. निलम गो-हे यांनी दिले.

            कोविडमध्ये विधवा झालेल्या महिलांना बँकेकडून कर्ज परतफेडीसाठी होणा-या समस्यांसंदर्भात विधानभवन येथे उपसभापती डॉ. निलम गो-हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

डॉ. गो-हे म्हणाल्या की, राज्यात कोविड काळात ज्या महिला विधवा झाल्या आहेत, त्यांना वारसा हक्काने  बँकांची थकित कर्जे परतफेड करावी लागणार आहे. मात्र, अनेक महिला हे कर्ज अदा करू शकत नाहीत. अशा महिलांची माहिती संकलित करून, आत्तापर्यंत त्यांनी अदा केलेली रक्कम आणि उर्वरित रक्कम, विमा काढण्यात आला होता का, तसेच एकरकमी रक्कम देण्यास त्या तयार आहेत का यासंदर्भात अधिक माहिती घेऊन, त्यांच्यासंदर्भात सहानुभूतिपूर्वक विचार करून संबंधित आर्थिक पुरवठा करणा-या संस्थांनी निर्णय घ्यावा असेही उपसभापतींनी सांगितले.

कोरोना काळातील ५० हजार रूपये सानुग्रह अनुदान ज्या महिलांना अद्याप प्राप्त झाले नाही; त्यांना मदत व पुनर्वसन विभागाच्या समन्वयाने अनुदान तातडीने वितरित करण्यात यावी. असेही उपसभापती यांनी सांगितले. ज्या बालकांचा बालसंगोपन योजनेत समावेश नाही, अशा बालकांना या योजनेअंतर्गत समावेश करून, प्रतिमाह ११०० रूपये प्रमाणे शासकीय आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी. एकल किंवा दोन्ही पालक गमावलेल्या पालकांच्या बालकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेला बाल न्यायनिधी राज्यातील सर्व बालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. तसेच, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात संबंधित शाळांना विनंती करण्यात येणार असल्याचेही उपसभापती यांनी सांगितले. पंडिता रमाबाई योजनेअंतर्गत ज्या महिलांना उद्योग सुरू करावयाचा आहे. अशा महिलांची माहिती जमा करावी व योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. विधवा महिलांना कौशल्य विकास विभागांतर्गत प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही उपसभापती डॉ. निलम गो-हे यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीत सह आयुक्त व निबंधक अनिल कवडे, विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण वाडेकर, महिला व बालविकासचे आयुक्त दिलीप हिरवाळे यांच्यासह अधिकारी आणि महिला उपस्थित होत्या.Post a Comment

Previous Post Next Post