जेलमधून बाहेर येताच राऊतांची पहिली प्रतिक्रिया, नेमका इशारा कोणाला..?



प्रेस मीडिया लाईव्ह :

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील : 

आज तब्बल 100 दिवसांनी खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर त्यांची आर्थर रोड कारागृहातून आज सुटका झाली. कारागृहाबाहेर येताच शिवसैनिकांनी संजय राऊत यांचं भव्य स्वागत केलं.

 राऊत यांनी यावेळी माध्यमांशी देखील संवाद साधला. आलोय बाहेर बघू आता असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. माझी अटक न्यायालयानेच बेकायदा ठरवली, सुटल्याचा आनंदर असल्याचं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले राऊत संजय राऊत यांना आज अखेर जामीन मिळाला.

जामिन मिळाल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका झाली. जेलबाहेर येताच राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. आम्ही लढणारे लोक आहोत. मी आलोय बाहेर बघू आता असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.सुटल्याचा आनंद होत आहे. कोर्टाने माझी अटक बेकायदेशीर ठरवली. माझी तब्येत ठिक नाही. त्यामुळे नंतर प्रसारमाध्यमांशी सविस्तर संवाद साधणार असल्याचंही राऊत यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान सुटकेनंतर संजय राऊत आता थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर पोहोचणार आहे. ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. जेलमधून बाहेर येताच राऊतांची पहिली प्रतिक्रिया, नेमका इशारा कोणाला?संजय राऊत यांचं जंगी स्वागत संजय राऊत यांना तब्बल शंभर दिवसांनी जामीन मिळाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण आहे.राऊत जेलबाहेर येताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. संजय राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर देखील मोठा जल्लोष सुरू आहे. कार्यकर्ते मशाली घेऊन घोषणाबाजी करत आहेत.

आज ठाकरे गटात उत्साहाचं वातावरण आहे. ...तेव्हाही असाच जल्लोष झाला, संजय राऊतांच्या जामिनावर मुनगंटीवारांना आठवली पुण्यातली ती घटनामुनगंटीवाराचा टोला दरम्यान दुसरीकडे राऊत यांच्या स्वागतावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टोला लगावला आहे. अनेकांना जामीन मिळतो. जामीन मिळाल्यानंतर गजानन मारणे याने देखील जल्लोष केला होता. जामीन मिळाला म्हणजे निर्देष मुक्तता झाली असे नव्हे असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post