श्री दत्त (शिरोळ) ५१ वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु एकरकमी एफआरपी रुपये २९५०/- देणार...गणपतराव पाटील



प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/प्रतिनिधी:

श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन २०२२-२०२३ या ५१ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या हस्ते सकाळी १०-३० वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी १०-०० वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करुन कारखान्याने कमी खर्चात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले असून हे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील अग्रेसर आहे आणि या विस्तारीकरणात टप्प्याटप्प्याने गाळप क्षमता वाढविणेत येणार

असल्याचे सांगितले. यानंतर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्याने विस्तारीकरणाचे काम अल्पावधीतच अत्यंत चांगल्याप्रकारे पूर्ण केले आहे. या कामी सर्व कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे सहकारी, सर्व खातेप्रमुख, कामगारबंधू यांची मोलाची साथ लाभली. त्याचप्रमाणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आर.व्ही.दाणीसाहेब, नलवडेसाहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी या मुदतीमध्ये वेळोवेळी कारखाना साईटवर येवून मार्गदर्शन केले. कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. सहकार चळवळ टिकली पाहिजे. सहकार चळवळ

टिकली तरच सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल. कारखान्याने सभासद केंद्रस्थानी मानून कारखाना व्यवस्थापनाचे कामकाज चालू आहे. या हंगामासाठी एकरक्कमी एफआरपी रुपये २९५०/- देणार असून या हंगामात १५ लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले व सर्व सभासदबंधूनी आपला ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली. विस्तारीकरण कामामध्ये विविध शासकीय कार्यालये, शिरोळ नगरपरिषद, ग्रामपंचायत आगर यांचेसहीत मदत केलेल्या सर्वच घटकांचे आभार मानले. यानंतर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदिप बनगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिलकुमार यादव, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, संचालक बाबासो पाटील, शरदचंद्र पाठक, रघुनाथ पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, बसगोंडा पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, विजय सुर्यवंशी, महेंद्र बागे, संचालिका सौ. यशोदा कोळी, सौ. संगिता पाटील-कोथळीकर, निमंत्रीत मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील-हालसवडे, दरगू माने-गावडे, रावसाहेब नाईक यांचेसह ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील- नरदेकर, त्यांचे सर्व सहकारी, मौजे आगरचे सरपंच अमोल चव्हाण, डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलजयसिंगपूर- उदगांव बँकेचे चेअरमन सुरेश पाटील, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार,जयसिंगपूरचे माजी नगरसेवक संजय पाटील-कोथळीकर, शिरोळचे नगरसेवक पंडीतराव काळे, माजी सरपंच गजानन संकपाळ, विजय आरगे, अशोक पुजारी, सुरेश लंगरे, रावसाहेब गळतगे, मनोहर गोधडे, रघुनाथ पाठक, शिवानंद निकम, महादेव कुलकर्णी, मयुरभाई नारेचनीया, इरगोंडा देसाई, युनियनचे माजी अध्यक्ष नाना कदम व सर्व खातेप्रमुख, ऊर्जाकुर श्री दत्त पॉवर कंपनीचा सर्व स्टाफ, कामगार ट्रस्ट, कामगार सोसायटी, कामगार युनियनचे पदाधिकारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासदबंधू, कार्यकर्ते, हितचिंतक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post