श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित लकी ड्रॉ योजनेची उत्साहात सोडत

दादासो हलवाई हे बेड (संपूर्ण सेट )च्या पहिल्या बक्षिसाचे ठरले मानकरी


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/प्रतिनिधी:

येथील श्री दत्त भांडारच्या वतीने आयोजित केलेल्या लकी ड्रॉ योजनेमध्ये अर्जुनवाड मधील दादासो हलवाई हे बेड (संपूर्ण सेट) च्या पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरले. द्वितीय बक्षीस शिवाजी पोळ यांना सोफासेट, तृतीय बक्षीस मंगला ट्रेडिंग कार्पोरेशन यांना डायनिंग टेबल मिळाले. लकी ड्रॉ योजनेची सोडत दत्त उद्योग समूहाचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दत्त भांडारच्या प्रांगणात करण्यात आली.

गणेशोत्सव, दसरा आणि दीपावली या उत्सव, सणानिमित्त ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २५ ऑगस्ट २०२२ ते दि. ३१ ऑक्टोबर २०२२ अखेर ३ हजार रुपयांवरील खरेदीवर एक कुपन देण्यात आले होते. या योजनेमध्ये ९७५ जणांनी भाग घेतला होता. यामध्ये विविध ५१ बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

    श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार यांनी दत्त भांडारच्या प्रगतीचा आढावा घेऊन म्हणाले, प्रामाणिकपणा, विश्वास आणि आपुलकीच्या जोरावर दत्त भांडारने शिरोळ पंचक्रोशीतील ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरून ४० वर्षात देदीप्यमान यश मिळवले आहे. गणपतराव पाटील दादा हे सहकारात नवनवीन कल्पना मांडून त्या रुजविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा भांडारला होत आहे.

स्वागत व प्रास्ताविक करताना दत्त भांडारचे जनरल मॅनेजर सदानंद घोरपडे म्हणाले, दि.१ ते २८ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत एकूण विक्री १ कोटी ८५ लाख ७७ हजारांची उच्चांकी झाली आहे. यादरम्यान सभासदांना १० टक्के प्रमाणे माल स्वरूपात रिबेटचे वितरण केले असून ही रक्कम ६ लाख ६२ हजार ५५० इतकी आहे. यावर्षी प्रथमच भव्य साडी सेलचे आयोजनही करण्यात आले होते. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

  प्रारंभी स्व. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. दत्त विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले. भांडारच्या व्हॉइस चेअरमन सौ. अनिता कोळेकर, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, सौ.अस्मिता पाटील, आप्पासो मडिवाळ, विजयकुमार गाताडे, नासर पठाण, यांच्यासह सर्व संचालक, दत्त कारखान्याच्या संचालिका सौ. संगीता पाटील कोथळीकर, महेंद्र बागे, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुनीर दानवाडे, प्रा. मोहन पाटील, विठ्ठल पाटील, शेडशाळचे सरपंच गजानन चौगुले यांच्यासह मान्यवर तसेच स्टोअर व परचेस मॅनेजर सुहास मडीवाळ, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. आभार संचालिका डॉ. राजश्री पाटील यांनी मानले. 

   दत्त भांडारच्या लकी ड्रॉ योजनेमधील इतर भाग्यवान विजेते खालीलप्रमाणे आहेत.  टी.व्ही. शोकेस- प्रभाकर घेवारे, लाकडी कपाट- राजगोंडा पाटील, दिवाण सेट- चिदानंद बोरगावे, कुलर- विश्वनाथ जाधव, ड्रेसिंग टेबल- दिगंबर कोळी, स्टँड फॅन- रमेश पाटील, लाकडी आराम खुर्ची- पोपट लोंढे, टेबल फॅन- आर्या राजेभोसले. याबरोबरच पैठणी साडी- १०, शूटिंग शर्टिंग- १० व  हॉट पॉट- २० अशी इतर बक्षीस होती.


1 Comments

  1. Depending on your software / printer configuration rafts could be difficult to remove and likewise mar the bottom of your prints. As with the MK3S+, you can to|you probably can} put together fashions for printing on the MP Cadet with Cura. Despite the initial snafu we had in downloading the correct model, we recognize that all one|that each one} of Cura’s features are available even when you’re working with such a cheap printer. The MK3S+ can print using normal filaments such as ABS and PLA, Elongated Toilet Seats properly as|in addition to} extra interesting materials like nylon or those who comprise carbon fiber.

    ReplyDelete
Previous Post Next Post