खारघर शहर “नो लीकर झोन" घोषित करण्याची मागणी



प्रेस मीडिया लाईव्ह :

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 खारघर शहरात निरसुख पॅलेस या नव्या बार अँड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रीचा परवाना दिला आहे. तब्बल १५ वर्षांनंतर शहरात नव्याने बार अँड रेस्टॉरंट सुरू झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. खारघरची ओळख ही नो लीकर झोन म्हणून आहे. या ओळखीला तडा जात असल्याने शेकापच्या शिष्टमंडळाने माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची दि. ९ रोजी भेट घेत खारघर शहराला अधिकृतरीत्या 'नो लीकर झोन'चा दर्जा देण्याची मागणी केली

      शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने पनवेल महापालिकेच्या २०१७ च्या सर्वसाधारण सभेत खारघर शहर “नो लीकर झोन” घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. खारघर शहर ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असताना खारघर शहर “नो लीकर झोन” घोषित करून ठराव प्रारीत करण्यात आला होता. ग्रामपंचायतीचे रुपांतर महापालिकेत होताच खारघर शहरात दारू विक्रीस परवानगी देण्यात येवू लागली.

        खारघर शहराची नोंद “नो लिकर झोन” म्हणून कित्येक वर्षापासून आहे. खारघर शहराला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. शहरामध्ये कित्येक मोठ-मोठे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये अस्तित्वात आहेत. खारघर शहरात एका नव्या बार अंड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याने "नो लिकर झोन" म्हणून ओळख निर्माण झालेल्या शहराच्या प्रतिमेला तडा निर्माण झाला आहे.

खारघर शहरामधून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा विरोध आणि संताप निर्माण होत आहे. खारघर शहर “नो लीकर झोन" म्हणून न घोषित केल्यास शेतकरी कामगार पक्षाकडून मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल. असे पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले आहे. याबाबतचे निवेदन आयुक्त याना देण्यात आले. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, माजी नगरसेवक डी. पी. म्हात्रे, शेकाप सह जिल्हा चिटणीस प्रभाकर कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post