शिधापत्रिकाधारकांना आता मोफत अन्नधान्याच्या वाढीव मर्यादेचा लाभ घेता येणारप्रेस मीडिया लाईव्ह :

सुनील पाटील :

 रेशन कार्डधारकांसाठी आणखी एक योजना जाहीर करण्यात आली आहे. अंत्योदय रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देणार असल्याचं सरकारने जाहीर केले आहे.त्यासोबतच तेल आणि मीठही मोफत मिळणार आहे. शिधापत्रिकाधारकांना आता मोफत अन्नधान्याच्या वाढीव मर्यादेचा लाभ घेता येणार आहे

समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागास गटासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यापैकी अंत्योदय योजना ही त्याचाच एक भाग आहे. अंत्योदय अन्न योजनेमध्ये राज्यांमधील TPDS अंतर्गत समाविष्ट असलेल्या BPL कुटुंबांपैकी एक कोटी गरीब कुटुंबांची ओळख पटवून त्यांना गहू 2 रुपये प्रति किलो आणि तांदूळ 3 रुपये किलो दराने मिळणार आहे.

सरकारने एका योजनेबाबत घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत रेशनकार्ड धारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. सरकारने अन्य शिधापत्रिकाधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, सामान्य शिधापत्रिकाधारकांना फक्त 2 रुपये किलो दराने गहू आणि 3 किलो दराने तांदूळ मिळेल, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, यावेळी कार्डधारकांना गव्हासाठी किलोमागे 2 रुपये आणि तांदळासाठी 3 रुपये प्रतिकिलो खर्च करावा लागणार आहे.त सेच गहू आणि तांदूळशिवाय सर्व रेशन कार्ड यांना मीठ, तेल आणि हरभऱ्याची अतिरिक्त पाकिटे शिल्लक आहेत, त्यांना शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय कार्डधारकांना मोफत वाटप केले जाईल. याबाबत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य द्या हा नियम असेल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, याचा साठा संपल्यावर हे साहित्य मोफत दिलं जाणार नाही. कोरोना महामारीच्या काळापासून आतापर्यंत सरकारकडून सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत मोफत रेशन धान्याची सुविधा देण्यात आली होती. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत नागरिकांना ही सुविधा मिळते आहे.

तर दुसरीकडे आतापर्यंत सरकारने 10 लाख कार्डधारकांची रेशन कार्ड्स रद्द केली आहेत. अनेक अपात्र नागरिक रेशन सुविधेचा लाभ घेतात, असे दिसून आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post