रिपब्लिकन अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अब्दुल जलील शेख देहूरोड, यांची निवड

 अनेक अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करणारे कर्तव्यदक्ष  अधिकारी अशी ओळख निर्माण करणारे माजी अधिकारी अब्दुल जलील शेख  देहूरोड,यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात प्रवेश


प्रेस मीडिया लाईव्ह :

 अन्वरअली शेख

पिंपरी चिंचवड :  देहूरोड  : अब्दुल जलील शेख,  देहूरोड  यांची रिपब्लिकन अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावेळी  आपले विचार प्रकट करताना ते म्हणाले, गौर गरीब आणि गरजू लोकांसाठी मी सदैव झटत राहील आणि  पक्षाशी निष्ठावंत राहून पक्ष वाढीसाठी सदैव प्रयत्न करेल असं अब्दुल जलील यांनी मनोगत व्यक्त केलं.

 अनेक अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी व वस्तू व सेवा कर विभागाचे माजी अधिक्षक अब्दुल जलील शेख यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात प्रवेश केला असून त्यांची अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशाने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष अॅड. अयुब शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.

जलील हे मुंबई येथे नाकोटीक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणांचा पर्दाफाश करण्यात आघाडीवर होते. त्यांनी महसूल, गुप्तचर संचालनालय मध्येही यशस्वीरित्या काम पाहिले आहे. रत्नागिरी येथे सीमा शुल्क विभागातही ते काही वर्षे कार्यरत होते. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्यास सुरूवात करीत असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. त्यांच्या पक्ष प्रवेशाने मुस्लीम समाजाची मोठी ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. रिपब्लिकन पक्षात विविध विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना आणणार असल्याचे व पक्षाची ताकद वाढवणार असल्याचे शेख यांनी यावेळी सांगितले.या पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष आयुबभाई शेख , सरचिटणीस खाजाभाई शेख व प्रमुख पदाधिकारी  मान्यवर उपस्थित होते .Post a Comment

Previous Post Next Post