पोलीस ठाण्यातील त्याचा रील पडला त्याला महागातप्रेस मीडिया लाईव्ह :

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :

सुरेंद्र पाटील हा बांधकाम व्यावसायिक असून जून महिन्यात 50 करोडचा पैशांचा पाऊस पाडतो असे सांगत 6 जणांनी सुरेंद्र यांची फसवणूक केली होती.

डोंबिवली- 50 करोडचा पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून त्याची फसवणूक झाली होती.

 या गुन्ह्यातील मिळालेले पैसे घेण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला, तेथे पैसे हातात पडल्यानंतर, त्याच पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या खूर्चीवर बसून रील्स बनविण्याचा मोह सुरेंद्रला झाला. त्याने व्हिडीओ बनविला आणि तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. मानपाडा पोलीस ठाण्यातील रील या रील मास्टरला चांगलेच महागात पडले असून, हातात पैसा खेळण्याऐवजी आता पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत. सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी असे या आरोपीचे नाव असून मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणारा सुरेंद्र पाटील हा बांधकाम व्यावसायिक असून जून महिन्यात 50 करोडचा पैशांचा पाऊस पाडतो असे सांगत 6 जणांनी सुरेंद्र यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी व अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीकृष्ण गोरे हे करीत होते. यातील 19 लाख 96 हजाराची रक्कम पोलिसांनी जप्त केली होती. ही रक्कम सुरेंद्र यांची असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना परत करावयाची होती.

त्यानुसार 25 ऑक्टोबरला सुरेंद्र हा आपले पैसे घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याने पोलीस ठाण्यातच एक व्हिडीओ बनविला. रानी नहीं है तो क्या हुआ, बादशहा आज भी लाखो दिलों पे राज करता है असे संगीत टाकत पोलीस कक्षातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून तो व्हिडीओ बनविला आहे. पाठीमागे पोलिसांचा लोगो देखील आहे. हा व्हिडीओ सुरेंद्रने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. तसेच त्याचा पैशांसह असलेला एक व्हिडीओ आणि हातात बंदूक घेतलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला, आणि एकच खळबळ उडाली.

हा व्हिडीओ पोलिस आयुक्तालयांच्या ट्विटर हॅण्डलवर देखील काहींना पाठविले. हे व्हिडीओ ट्विटर हॅण्डलवर जाताच मानपाडा पोलिस खडबडून जागे झाले. सुरेंद्र यांच्यावर त्वरीत मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांनी यावेळी सांगितले की गुन्ह्यातील तपासात जप्त करण्यात आलेली रक्कम परत घेण्यासाठी सुरेंद्र हा पोलिस ठाण्यात आला होता. यावेळी अधिकाऱ्यांच्या कक्षात कोणीही नसल्याने त्याचा फायदा घेत सुरेंद्र याने आपल्या मोबाईल मध्ये एक व्हिडीओ तयार केला आणि तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. तसेच इतर काही रील मध्ये त्याच्या हातात बंदूक तसेच महागडी एक गाडी असून त्या गाडीवर पोलिसांचा लोगो देखील आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मर्सिडीज कार आणि त्या गाडीमध्ये असणारे हत्यार असा एकूण 65 लाख 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्याच्या विरोधात इतर पोलिस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल आहेत असे सांगितले.

आरोपी सुरेंद्र यास कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याला 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post