तुरुंगातील धिंगाण्यामुळे सचिन वाझे पुन्हा एकदा वादात सापडला आहे

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेचे नवे नाटक उघडकीस आले आहे.वाझे सध्या नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. त्याने कारागृहातील सुरक्षा रक्षकांसोबत असभ्य वर्तन केले, त्यांना धमकीही दिली, असा आरोप करीत तळोजा तुरुंग प्रशासनाने वाझे विरोधात मुंबईतील सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारी मुळे सचिन वाझे हा न्यायालयाच्या तडाख्यात सापडला.तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीमुळे आपल्या अडचणींमध्ये मोठी वाढ होऊ शकते हे लक्षात येताच वाझेने सत्र न्यायालयात माफी मागितली. तुरुंगातील धिंगाण्यामुळे तो पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

रुग्णालयात नेण्यासाठी आकांडतांडव

सचिन वाझे हा सुरुवातीपासूनच जेलमधील त्याच्या वागण्यावरून चर्चेचा विषय राहिला आहे. त्याने नुकतेच सत्र न्यायालयात आपल्या डोळ्यांच्या त्रासाबद्दल म्हणणे मांडले आहे.

दोन्ही डोळ्यांमध्ये ग्लुकोमा झाला असल्याने मला रुग्णालयात दाखल होण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती त्याने सत्र न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने त्याच्या या विनंतीची दखल घेताना आज तळोजा तुरुंग प्रशासनाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

याच दरम्यान वाझेने रुग्णालयात नेण्यासाठी तळोजा तुरुंगातील सुरक्षारक्षकांबरोबर हुज्जत घातल्याचे उघडकीस आले आहे. त्याने सुरक्षारक्षकांना असभ्य भाषेत धमकावल्याचेही तुरुंग प्रशासनाने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर वाझेने न्यायालयात माफी मागितल्याचे समजते.

पुढील सुनावणी 10 नोव्हेंबरला

सचिन वाझे हा ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरे हत्या प्रकरणात देखील आरोपी आहे. त्याने गेल्या आठवड्यात रुग्णालयात नेण्यासाठी जेल अधीक्षकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान त्याने सुरक्षारक्षकांसोबत असभ्य वर्तन केल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post