कोल्हापूर : सीपीआर उद्या बंद राहणार


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे : 

 कोल्हापूर सीपीआरमधील वीज पुरवठा बंद उद्या राहणार असल्याने सीपीआरमधील सिटी स्कॅन,एकस रे,ऑटोकलेव्ह युनिट आणि सेंट्रल एसी, पाणी पुरवठा पंप बंद राहणार आहेत. याची नोंद रुग्णांनी घ्यावी असे आवाहन सीपीआर प्रशासनाने केलं आहे. उद्या सोमवारी वीज वितरणाच्या सीपीआरला वीज पुरवठा करणाऱ्या सबस्टेशनमधील एच डी फीडर पिलर बदलून त्या ऐवजी आयसोलेटर पॅनल बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती सीपीआरकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post