देहूरोड कॉग्रेस कमिटीच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांचा जाहिर निषेध प्रेस मिडिया लाईव्ह : 

अन्वरअली शेख : 

देहूरोड दि.२२,शहरतील एरिहासिक सुभाष चौक देहूरोड येथे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी व पुणे जिल्ह्य कॉग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार तसेच  देहूरोड शहर ब्लॉक कॉग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व बीजेपी चे प्रवक्ते  सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल त्यांचा जाहिर निषेध करण्यात आला. 

त्यावेळी देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा. हाजीमलंग काशीनाथ मारिमुत्तु यांनी सुभाष चौक येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व बीजेपी चे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात आंदोलनात्मक घोषणा बाजी करण्यात आली. त्यावेळी प्रांतिक सदस्य दिपक सायसर यांनी आपल्या भाषणाव्दारे छत्रपति शिवाजी महाराजांच्या महानतेचा उल्लेख केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व बीजेपी चे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांची  पदा-वरुन हकालपट्टी करण्यात यावी व राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी गावकामगार तलाठी मा. आरती खरे मॅडम यांना निवेदन देण्यात आले. तसेच मा. देहूरोड पोलीस अधिकारी श्री. अजित सावंत सर  यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले  पुणे जिल्ह्य महिला  उपाध्यक्षा राणीताई पांडियन, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, उपाध्यक्ष शंकर टि जयसिंग, अल्पसंख्याक सेल देहूरोड अध्यक्ष मेहबूब गोलंदाज, किसान सेल अध्यक्ष संभाजी पिंजण, युवा नेते मलिक शेख, सह-सचिव बबन टोंम्पे, रईस शेख, आसिफ शेख, करिम शेख बाबूभाई , तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.Post a Comment

Previous Post Next Post