आलेगाव येथील निर्गुणा नदीपात्रातुन अवैध वाळूची तस्करी जोमात!

 महसूल कराला लाखो रुपयांचा फटका...

पातूर तहसील प्रशासन मात्र मूग गिळून गप्प


प्रेस मीडिया लाईव्ह :

पातुर तालुका प्रतिनिधी :  राहुल सोनोने (मळसुर)

 येथील गावालगत निर्गुणा नदीपात्रामध्ये गेल्या दोन वर्षांपासून वाळू तस्कर अवैध खोदकाम करून शेकडो ब्रास  वाळूची तस्करी केली आहे,करीत आहेत.त्यामुळे शासनाचा महसूल कराचे मोठे नुकसान होत असताना पातूर तहसील प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.तरी या अवैध वाळू तस्करी करणाऱ्यावर कडक कारवाई करून धार्मिक स्थळाजवळ सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबवावे.

प्राप्त माहिती नुसार पर्यावरण विभागाने,

 आलेगाव निर्गुणा नदीपात्रातील खनिजाच्या अवलोकना नुसार,जिल्हा प्रशासनाला आलेगाव निर्गुणा नदीपात्रातील वाळू स्थळे  लिलाव करण्यायोग्य नसल्याने जिल्हा प्रशासनाला वाळू लिलाव करण्याची परवानगी नाकारल्यामुळे,सदर वाळू लिलावाच्या स्थळांचा लिलाव झालेला नाही.तरी पण जवळपास गेल्या दोन वर्षांपासून गावालगत असलेल्या निर्गुणा नदीपात्रामध्ये वाळू तस्करांनी मोठं,मोठे खोदकाम करून,शेकडो ब्रास वाळूची तस्करी केली.करीत आहेत.त्यामुळे महसूल प्रशासनाच्या लाखो रुपये महसूल कराचे मोठे नुकसान होत आहे.तसेच गावालगत निर्गुणा तीरावर असलेल्या महानुभाव पंथीय श्री चक्रधर स्वामी मंदिरा जवळ वाळू तस्करांनी खोदकाम करून वाळू तस्करीचा सपाटा सुरू केला त्यामुळे,मंदिराच्या अस्तिवाचा प्रश्न निर्माण झाल्याने भाविक भक्तांनी तिव्रसंताप व्यक्त केला आहे.या गंभीर बाबीकडे तालुका महसूल प्रशासन मात्र मूग गिळून आहे.तरी जिल्हाप्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन मंदिराजवळील निर्गुणा नदीपात्रातील अवैध वाळू खोदकाम करणाऱ्यावर कडक कारवाई करून सदरील खोदकाम तात्काळ बंद करून ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post