बोगस सुदर्शन चॅनलच्या तोतया पत्रकार मार्फत दैनिक शब्दमतच्या संपादकांची बदनामी करून जातीवाचक शिवीगाळ केली

 या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याकरिता मागणी मुख्यमंत्री कार्यालया पर्यंत


औरंगाबाद  : शब्दमत न्यूज नेटवर्क

सविस्तर माहिती पाहिल्यास निदर्शनास आल्याचे समजते की बीड बायपास जवळील झाल्टा फाट्या लगत असलेल्या अंबिका धाब्या जवळ पोलीस अधिकारी पथकाने जनावरांना वाहन करून जाणाऱ्या गाडीस पकडले असताना वृत्त संकलन करण्यासाठी आलेल्या पत्रकारातील ऑनलाइन बोगस सुदर्शन चॅनलचा तोतया पत्रकार बाबूलाल राठोड यांनी दैनिक शब्दमतचे संपादक अजमत पठाण यांना स्वतः फोन करून बोलावून घेतले व ज्या वेळेस अजमत पठाण हे घटनास्थळी पोहोचले असता  तोतया पत्रकार बाबूलाल राठोड व पोलीस अधिकारी यांच्यात मोठ्याप्रमाणात वाद व शिवीगाळ होत असल्याचे अजमत पठाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मध्यस्थीची भूमिका घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता, बोगस सुदर्शन चॅनलच्या तोतया पत्रकार बाबूलाल यांच्याद्वारे शब्दमतचे संपादक अजमत पठाण यांच्या वर अश्लील शिवीगाळ करण्यात सुरुवात करण्यात आली तसेच ते यावर ही न थांबता अजमत पठाण यांना जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचे ही निदर्शनास आले या प्रकरणाची दखल उपस्थित असलेल्या जमावाने घेतली व त्या जमावातील काही नागरिक वर्गाने बाबूलाल राठोड यांना समजावण्याचा प्रयत्न ही केला व बाबूलाल यांनी जमावास ही अपशब्द बोलण्यास सुरुवात केल्यास जमावाने बाबूलाल यांना चोप दिल्याचे समजते,

या नंतर बोगस सुदर्शन चॅनल चे  तोतया पत्रकार बाबूलाल राठोड यांनी आपल्या द्वारे केलेल्या वर्तनाची कसली ही माफी न मागता उलट पोलीस अधिकारी व बाबूलाल यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दैनिक शब्दमतचे संपादक अजमत पठाण यांची आपल्या चॅनल द्वारे बदनामी केली असल्याची माहिती संपादक अजमत पठाण यांच्या द्वारे मिळाली आहे,

बोगस सुदर्शन चॅनलच्या  तोतया पत्रकार  बाबूलाल राठोड यांच्या या वर्तनास लक्षात घेउन त्यांच्या विरोधात योग्य कारवाही करण्यात यावी अशी मागणी अजमत पठाण यांच्या द्वारे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे, पालकमंत्री श्री संदीपान भुमरे,उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्तांलय, औरंगाबाद जिल्हा अधीक्षक श्री मनीष कलवानिया , जिल्हा अधिकारी अस्तिक कुमार पांडेया तसेच या व्यतिरिक्त इतर  कार्यालयात करण्यात आली,

घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व पत्रकार बांधवात नाराजी व्यक्त होत आहे तसेच पत्रकार बांधवा द्वारे या प्रकाराची निंदा व विरोध केली जात आहे


Post a Comment

Previous Post Next Post