रिक्षामधील आरसे काढून टाका', महिलांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी, काय आहे प्रकार...?

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :

  जगभरात रोड अपघातामुळे होण्याऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. भारतातही दरवर्षी सुमारे दीड लाख लोक रोड अपघातामुळे मरण पावतात. त्यामुळे रोड सेफ्टी अर्थात रस्ता सुरक्षा हा चिंतेचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे.

 अपघातांची अनेक कारणं असतात. कधी चालकांचा बेशिस्तपणा तर कधी रस्त्यांची दुरवस्था प्रामुख्यानं अपघातांना कारणीभूत ठरते. मात्र, वाहनांना असलेले विविध प्रकारचे आरसेदेखील अपघातांना कारणीभूत ठरू शकतात, असं मत महाराष्ट्रातील एका एका स्वयंसेवी संस्थेनं (एनजीओ) मांडलं आहे. एका स्वयंसेवी संस्थेनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य परिवहन अधिकाऱ्यांकडे एक याचिका पाठवली आहे.

बहुतेक पुरुष ऑटोचालक हे ड्रायव्हरच्या समोर लावलेल्या 'रिअर व्ह्यु मिरर'चा वापर प्रवासी महिलेकडे एकटक बघण्यासाठी किंवा रस्त्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांकडे पाहण्यासाठी करतात. त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होतं आणि त्यातून अपघात होतात असं एक महत्त्वपूर्ण निरीक्षण या एनजीओने आपल्या याचिकेत दिलं आहे. हे टाळण्यासाठी रिक्षातील असे आरसे काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी एनजीओने केली आहे, असं वृत्त 'द टाईम्स ऑफ इंडिया'नं प्रसिद्ध केलं आहे. (NEWS 18 लोकमतचा दणका, शेतकऱ्यांकडून 400 रुपये वसुली करणारे अधिकारी निलंबित) मुंबईतील वॉचडॉग फाउंडेशन या एनजीओनं मुख्यमंत्री आणि राज्य परिवहन अधिकाऱ्यांकडे याचिका दिली आहे.

याबाबत एनजीओचे वकील गॉडफ्रे पिमेंटा हे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या याचिका पत्रामध्ये म्हणालंय की, "बहुतेक पुरुष ऑटो रिक्षाचालक रिअर-व्ह्यु मिररमधून त्यांच्याकडे (प्रवासी महिलेला एकटक) बघतात. त्यामुळे महिलांना अवघडल्यासारखं होतं. सतत आरशात बघितल्यामुळे ड्रायव्हरचं लक्ष विचलित होऊन अपघात होण्याचीही शक्यता असते. ही बाब काही महिला प्रवाशांनी एनजीओच्या निदर्शनास आणून दिली आहे." (Car Care Tips: कितीदा सांगायचं भाऊ!

'या' छोट्या चुकांनी कारच्या सस्पेन्शनची लागते वाट, वेळेतच व्हा सावध) "इतर चारचाकी वाहनांप्रमाणे, ऑटो-रिक्षांना रिअर-व्ह्यु मिररची आवश्यकता नसते. कारण, त्यांच्या दोन्ही बाजूला मोठे साइड-व्ह्यु मिरर असतात. त्यांचा वापर करून ते सहज वाहन चालवू शकतात," असंही या पत्रात म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साइड मिरर्समुळे चालकांना मागील बाजूनं येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेण्यास मदत होते.

कायद्यानुसार, या आरशाची रुंदी तीन इंच आणि लांबी 12 इंचांपेक्षा जास्त नसावी. प्रत्येक वाहनाला फक्त दोन साइड-व्ह्यु मिरर असावेत. दरम्यान, एनजीओनं तक्रारीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेतली जाईल, असं एका आरटीओ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. एनजीओनं घेतलेल्या आक्षेपाबाबत ऑटो ड्रायव्हर संघटना काय प्रतिक्रिया देतील, हे पाहणं गरजेचं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post