माजी पंतप्रधान स्व इंदिराजी गांधी, आणि स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

   इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी  यांच्या पुण्यतिथी (राष्ट्रीय संकल्प दिवस) निमित्त तसेच स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त (राष्ट्रीय एकता दिवस) महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. तसेच यावेळी राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त उपस्थितांच्या कडून राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेणेत आली.

         याप्रसंगी सहा.आयुक्त केतन गुजर, नगरसचिव विजय राजापुरे, जल अभियंता सुभाष देशपांडे, नगररचनाकार रणजित कोरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील , प्रविण बोंगाळे, सदाशिव शिंदे, संजय शेटे यांचेसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी   उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post