जिल्ह्यात सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ३५ कोटींचे वितरण



 प्रेस मीडिया लाईव्ह

अन्वरअली शेख :

पुणे - जिल्ह्यात सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण  आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण या दोन योजनांच्या एकूण ६८ हजार ९७१ लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये  जमा करण्यासाठी ३५ कोटी ३९ लक्ष २ हजार १०० रुपये अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे.

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात  राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण या दोन योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर २२ ते डिसेंबर २०२२ पर्यंत कालावधीचे अर्थसहाय्य वितरण करण्यासाठी अनुदान शासनस्तरावरुन प्राप्त झाले आहे. हे अनुदान जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आले असून ही रक्कम वेळेवर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहे. 

आंबेगाव तालुक्यातील १ कोटी ५३ लक्ष २५ हजार (२ हजार ९९१), बारामती ५ कोटी २५ लक्ष ३८ हजार २००(८ हजार ८९६), भोर २ कोटी ९६ लक्ष ९६ हजार ८०० (७ हजार ३८०), दौंड  १ कोटी ८८ लक्ष ४८ हजार ६०० (३ हजार ९२२), इंदापुर २ कोटी ५४ लक्ष ६८ हजार ८०० (५ हजार ७१५), जुन्नर  ३ कोटी २० लक्ष १२ हजार (५ हजार ६८२), मावळ १ कोटी ३५ लक्ष ५० हजार (३ हजार १३२), मुळशी १ कोटी ३५ लक्ष ५० हजार (२ हजार ७७२), पुरंदर २ कोटी ६१ लक्ष (५ हजार २६५), खेड  २ कोटी ४७ लक्ष, (४ हजार १६) शिरूर ३ कोटी ५९ लक्ष ६२ हजार ८०० (६ हजार ७६७), वेल्हा ६८ लक्ष (१ हजार ५३७), पुणे शहर १ कोटी ८८ लक्ष आणि  हवेली (४ हजार ५१४) तालुक्यासाठी ३ कोटी ४२ लक्ष (६ हजार ३८२) रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. *(कंसात लाभार्थ्यांची संख्या)

संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण  आणि श्रावणबाळ सेवा योजना सर्वसाधारण योजनेतील दिव्यांग, निराधार, परितक्त्या, विधवा, घटस्फोटीत, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी इत्यादी सर्व दुर्बल घटकांना अर्थसहाय्य रक्कम ही वेळेवर दरमहा देण्यात येणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जाती, जमाती या लाभार्थ्यांचेदेखील माहे ऑक्टोंबर २०२२ पर्यंतचे अनुदान यापूर्वीच तहसील कार्यालयांना  वितरित करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांनादेखील ही अर्थसहाय्य रक्कम दरमहा वेळेवर देण्यात येणार आहे.

या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्याच्यां वैयक्तीक खात्यावर तात्काळ अर्थसहाय्याच्या रकमा जमा करण्याची कार्यवाही तहसील कार्यालयांनी सुरू केली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post