गज्या मारणे, रूपेश मारणे, पप्पु उर्फ सचिन घोलप सह 14 जणांवर मोक्का.



प्रेस मीडिया लाईव्ह :

   अन्वरअली शेख :

पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह 14 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात मंगळवारी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) MCOCA ची कारवाई करण्यात आली आहे. सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय 43, रा. धनकवडी), हेमंतऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय 39,रा. बुरली, ता. पलुस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय 46, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय 50, रा. समर्थनगर, कोडोवली, जि.सातारा), गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख), रुपेश कृष्णाराव मारणे (रा.कोथरुड), संतोष शेलार (रा.कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा. नर्हे), नितीन पगारे (रा.सातारा), प्रसाद खंडागळे (रा.तळजाई पठार, सहकारनगर), नवघणे अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत.यात चौघांना अटक करण्यात आली आहे. हा घटनेनंतर गज्या मारणे व इतर फरार झाले आहे.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या तपासात या टोळीने परिसरात आपले वर्चस्व निर्माण व्हावे व इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा याकरीता हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तसा प्रस्ताव पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांना पाठविण्यात आला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 

गज्या मारणे याने ताळाेजा तुरुंगातून सुटल्यावर मुंबई-पुणे महामार्गावर रॅली काढली होती. त्यावरुभन त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरानंतर त्याला एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यातून सुटून आल्यावर तो शांत होता. मात्र, आता सुपारी घेऊन मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे  गुन्हे शाखा युनिट 5 चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील ,सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, शैलजा जानकर, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, अविनाश लाहोटे, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे,

राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, अनिल मेंगडे, प्रमोद टिळेकर, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, सुरेंद्र साबळे, विनोद शिवले, अकबर शेख पवन भोसले, रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर,रुपाली कर्णवर यांच्या पथकाने काही आरोपींना अटक केली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post