आंबेडकरी विचारांच्या वाढत्या प्रभावामुळे भागवतांचे स्वर बदलले ? बहुजनांच्या मतांवर डोळा ; अँड.चंद्रशेखर आजाद

 

 "आझाद समाज पार्टी"बहुजनांच्या हक्कासाठी लढा आणि आंबेडकरी विचारांचा वारसा ; रहीम सय्यद.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 अन्वरअली शेख :

पुणे ; दि १८ बहुजन समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे, हा समाज मोठा असूनही केवळ एकजूट नसल्यामुळे काहीजण गैर फायदा घेत आहे, त्यामुळे सर्व बहुजनांननी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अँड.चंद्रशेखर आजाद  राष्ट्रीय अध्यक्ष आजाद समाज पार्टी, संवस्थपक भीम आर्मी,यांनी औरंगाबाद येथील  आजाद  संवाद मेळाव्यात ते बोलत होते, यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.भाई चंद्रशेखर आजाद यांनी आर.एस.एस वर निशाणा साधत उपस्थितांना संबोधित केले की भागवत हे जाती संपवण्याच्या भाषा करत आहेत हयांचे सरकार सत्तेत आहे मग ह्याना कोणी थांबवल्य ? यांचा डोळा तुमच्या मतांवर आहे हे लक्षात घेतले पाहिजे .

शेतकर्याना पिक वीमा २५% देऊन थट्टा केली जात आहे, तर लिम्पी मुळे दगावलेले गौवांशा-ची नुकसान भरपाई अजुन सरकार ने केलेली नाही, तसेच राज्य सरकारने १६०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मुळे गोरगरीब वाड्या-वस्त्या वरच्या मुलांच्या शैक्षणिक जीवनावर प्रश्नचिह्न निर्माण झाले आहे...

रहीम भाई सय्यद अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर ,  अँड.चंद्रशेखर आजाद यांच्या महाराष्ट्र राज्य दौऱ्यात सहभागी  होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आझाद  समाज पार्टी ला प्रबल करण्यासाठी अँड.चंद्रशेखर भाई आझाद आणि रहीम सय्यद यांच्या-मध्ये चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे, माध्यमांशी संवाद साधताना रहीम सय्यद म्हणाले पिंपरी चिंचवड शहरात पक्ष वाढीसाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, तसेच  बहुजनांच्या हक्कासाठी लढत राहणे आणि आंबेडकरी विचार हा वारसा मला अँड.चंद्रशेखर आजाद यांच्या कडून लाभला आहे असे मत रहीम सय्यद यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद येथे आजाद समाज पार्टीचा *"आजाद संवाद मेळावा"* नुकताच पार पडला या मेळाव्याचे उदघाटक "भिम आर्मी चिफ,आजाद समाज पार्टी" राष्ट्रीय अध्यक्ष अँड भाई चंद्रशेखर आजाद यांनी तमाम भिम सैनिकांना मार्गदर्शन केले,हा मेळावा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनील वाकेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कोर कमीटी सदस्य आवेज अहमद, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा नेहाताई शिंदे, मुख्य प्रदेश प्रवक्ते फिरोज मुल्ला(सर), प्रदेश उपाध्यक्ष अँड सुमित साबळे,भीम आर्मी प्रदेश संयोजक सिताराम गंगावणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष कैलास जैसवार, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रहीमभाई सय्यद, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तोफीकभाई किल्लेदार, छ.शि.म.संघाचे अध्यक्ष संदिपभाऊ शेंडगे, उपाध्यक्ष राजेश रेड्डी आदी मान्यवर व पक्ष पदाधिकारी कार्यक्रते बहुसंख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन पवन पाखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल मकासरे यांनी केले



Post a Comment

Previous Post Next Post