प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या कार्याची प्रेरणा निकोप समाज निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरणारी : इंद्रजीत देशमुख

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी :

समाजात चांगुलपणाला सन्मान मिळाला कि दुष्ट लोकांना धसका बसतो. प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे हे सर्व दिशांना स्नेहाने भारुन टाकणारे संपन्न जीवन जगलेले व्यक्तिमत्व आहेत.त्यांच्या कार्याची प्रेरणा निकोप समाज निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरणारी आहे ,असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक , ख्यातनाम वक्ते इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.

इचलकरंजी येथे विविध शिक्षण संस्था , सामाजिक संस्था व संघटनांच्या प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे कृतज्ञता सोहळा समितीच्या वतीने जेष्ठ साहित्यिक, विचारवंत प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी समाज विकासात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचा कृतज्ञता सोहळा म्हणून आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.


प्रारंभी व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले आणि क्रांतिज्योती फुले यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. इंद्रायणी पाटील, रुचिता पाटील आणि वैभवी आढाव यांनी प्रार्थना सादर केली. मदन कारंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुनिल स्वामी यांनी प्रास्ताविक केले. अशोक केसरकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. 

 यावेळी महापालिकेचे प्रशासन अधिकारी सुधाकर देशमुख यांच्या हस्ते प्राचार्य डाॅ.सुनीलकुमार लवटे आणि सपना आवाडे यांच्या हस्ते रेखाताई लवटे यांचा जाहीर सत्कार परिसरातील साहित्यिकांची 75 पुस्तके , मानपत्र , स्मृतिचिन्ह देवून  करण्यात आला. 

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी माणसे एकमेकांच्या सहवासात बदलतात.म्हणून सामाजिक कार्याची सद्भावाची दिंडी खांद्यावर घेणारा समाज निर्माण करुया , असे आवाहन केले.

यावेळी प्रमुख पाहुणे ,संत साहित्याचे गाढे अभ्यासक , ख्यातनाम वक्ते इंद्रजित देशमुख यांनी संस्कार ,शिक्षण , सामाजिक बांधिलकी अशा विविध अंगांचा स्पर्श करत शाश्वत परिवर्तनाच्या विकासासाठी विधायक कार्याची प्रेरणा मिळणे आवश्यक आहे.याचसाठी प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे सामाजिक व विविध क्षेत्रातील कार्य खूप प्रेरणादायी असल्याचे सांगितले.हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चांगुलपणाची कास धरणे म्हणजे जीवन सार्थकी लावण्याचे ते परिमाण ठरेल ,असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुक्त सुधाकर देशमुख यांनी माझी जात माणसाची असे म्हणणारा आणि मानणारा समाज घडवण्याचे प्रवर्तक असलेल्या प्राचार्य डाॅ.सुशीलकुमार लवटे यांचा सत्कार हा ख-या अर्थाने मानवतावादाचा सन्मान असल्याचे सांगितले.

यावेळी मानपत्राचे वाचन प्रा‌.डाॅ. अमर कांबळे यांनी केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय रेंदाळकर यांनी तर आभार प्रदर्शन राजन मुठाणे यांनी केले.

यावेळी धोंडिराम कस्तुरे,गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, प्रशासनाधिकारी नम्रता गुरसाळे ,डी.बी.टारे ,प्रा.मोहन पुजारी ,

सुषमा दातार, शिवाजी जगताप,जयपाल बलवान,संजय होगाडे, अब्राहम आवळे, प्रकाश शिंदे,एम. डी.पाटील, महावीर कांबळे, देवदत्त कुंभार, शोभा स्वामी, रोहित दळवी, कृष्णात कोरे, दिलशाद मुजावर, विनायक होगाडे, अशोक चौगुले आदिंसह शिक्षक , सामाजिक कार्यकर्ते , विद्यार्थी , पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post