चांदणी चौकातील जुना पूल अखेर पाडण्यात आला .प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : चांदणी चौकात नवा उड्डाणपूल उभारण्यासाठी जुना पूल अखेर रविवारी मध्यरात्री 1 वाजता पाडण्यात आला. या साठी 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात आला. तत्पूर्वी शनिवारी रात्री 11 वाजेनंतर या चौकातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. प्रशासनाने सुरक्षिततेची काटेकोर पाहणी केल्यानंतर काउंटडाऊन सुरू करण्यात आले. त्यानंतर मोठा ब्लास्ट करून सुमारे 30 वर्षे जुना हा पूल पाडण्यात आला. दरम्यान, स्फोटानंतर पुलाचा काही भाग पडला नव्हता. त्यानंतर मात्र उर्वरित भाग जेसीबीद्वारे पाडण्यात आला.

दोन्ही बाजूंनी मिळून सुमारे 60 मीटर लांबी असलेल्या या पुलाच्या पाडकामासाठी शनिवारी रात्रीपासूनच जमावबंदी लागू करण्यात आली होती. तर, महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात आली होती. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ंदोस्त आणि वाहतूक नियोजन केले होते. त्यामध्ये पोलीस दलातर्फे 427 पोलीस अधिकारी-कर्मचारी नियुक्त होते. ब्लास्ट झाल्यानंतर माती, धूळ आणि खडी इतरत्र उडू नये, यासाठी पूर्ण पूल पांढऱ्या कापडाने झाकण्यात आला होता. “इडिफाइस’ कंपनीने या मिशनसाठी ब्लास्ट एक्‍स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विनायक महाडिक यांच्या तांत्रिक निरीक्षणाखाली हे मिशन पूर्ण केले. परिस्थिती नियंत्रणात येताच आणि धूळ कमी होताच पुढील काही मिनिटांत पुलाच्या परिसरातील अवशेष, राडारोडा उचलण्यात आला.

असा पाडला पूल....

चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात आले. तर, सुमारे 1 हजार 350 डिटोनेटरर्सचा उपयोग नियंत्रित पद्धतीने ब्लास्ट करण्यात आले. पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी 6 हजार 500 मीटर चॅनल लिंक्‍स, 7 हजार 500 वर्ग मीटर जिओ टेक्‍स्टाइल, 500 वाळूच्या पिशव्या आणि 800 वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी वापरण्यात आले. परिसरातील नागरिकांना सूचना देऊन 200 मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले होते.

आमच्या नियोजनाप्रमाणे पहिल्या ब्लास्टमुळे पुलाचा बहुतांश भाग पडला आहे. आता दुसऱ्या स्फोटाची गरज नाही. पुलाच्या बांधकामात अपेक्षापेक्षा जास्त स्टील, जाळी वापरण्यात आली होती. आता सिमेंटचे काम फुटले असून जाळी आणि स्टील काढताच उर्वरित पूल पडेल.

– आनंद शर्मा, ब्लास्ट एक्‍स्पर्ट

 वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता

पण या स्फोटाच्या दरम्यान संपूर्ण पूल उध्वस्त न झाल्यामुळे उरलेले पूलाचे काम जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. संपूर्ण पूल उध्वस्त न झाल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने पूल पाडण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे रस्ता रिकामा करण्यासाठीही जास्त वेळ जाऊ शकतो.

पूलाच्या पाडकामानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रीया दिली. पुण्याहून साताऱ्याकडे जाताना या पूलामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, अशी तक्रार येथील नागरिकांनी माझ्याकडे केली होती. त्या भागाचा सर्व्हे केल्यानंतर एनएचआय, पीडब्लूडी अधिकाऱ्यांना पूल पाडण्यासंबंधी सूचना केल्या होत्या. अखेर कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीने हा पूल पूल पाडण्यात आला, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.Post a Comment

Previous Post Next Post