विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुदळवाडी येथे वेग नियंत्रक गतिरोधक बसवा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दीपक गुप्ता यांची मागणी..


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी चिंचवड-चिखली कुदळवाडी चिखली या मुख्य चौपदरी रस्त्याच्या अंतर्गत अण्णासाहेब मगर बँकेजवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शाळा आहे.या शाळेच्या प्रवेशद्वारासमोर तसेच मेन रोडच्या  काही अंतरावर  गतिरोधक नसल्यामुळे वाहने वेगात येत जात असतात.शेकडो विद्यार्थी या रस्त्यावरून  शाळेमध्ये जातात. या रस्त्याच्या बाजूला येथे शाळा आहे,असे आकाशचिन्ह नाही.दिवसभर शाळेच्या निमित्ताने येथून विद्यार्थ्यांची येजा असते.

चिखली कुदळवाडी या परिसरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकी,चारचाकी आणि अवजड वाहनांची मोठी रहदारी सुरू असते.शाळेच्या  या परिसरात शाळा सुटताना आणि भरताना विद्यार्थी सुरक्षेकडे दुर्लक्ष होते.किमान मनपाच्या स्थापत्य विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी गतिरोधक बसवावेत,अशी मागणी  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस  दिपक गुप्ता यांनी एका निवेदनाद्वारे मनपा फ प्रभाग अधिकारी सीताराम बहुरे यांचे कडे केली आहे.Post a Comment

Previous Post Next Post