कोल्हापूर : कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा दुर्देवी मृत्यू .

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुरातील एका तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा दुर्देवी मृत्यू झाला.मारूती सुरवसे (वय 23 वर्ष) असं मृत झालेल्या पैलवानाचं नाव असून तो पंढरपूरच्या  वाखरी येथील रहिवाशी आहे.मारूती याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची प्राथामिक माहिती आहे. मूळ वाखरी येथील असलेला मारूती हा गेल्या काही वर्षांपासून कुस्तीचा सराव करण्यासाठी कोल्हापुरातील तालमीत दाखल झाला होता.

सोमवारी (3 ऑक्टोबर) रात्री मारूतीने नेहमीप्रमाणे तालमीत कुस्तीचा सराव केला. त्यानंतर तो अंघोळ करण्यासाठी गेला असताना, त्याच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना मारूती याची प्राणज्योत मालवली.या घटनेनं कुस्ती क्षेत्रातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मारूतीचे वडील वाखरीत शेती करतात. मारूतीला लहानपणा पासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी त्याला. कोल्हापूर येथील तालमीत कुस्तीच्या सरावासाठी पाठवण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post