प्रतिभा कांबळे-तायडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उद्योग सेल च्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी नियुक्ती

 डॉ. हेमंत श्याम सोनारे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.


प्रेस मीडिया लाईव्ह 

अन्वरअली शेख :

  पिंपरी चिंचवड दि.१०  पिंपरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उद्योग सेल च्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी प्रतिभा कांबळे-तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  रावेत येथील हॉटेल सिल्वर सेवन येथे नुकतेच झालेल्या कार्यक्रमात डॉ. हेमंत श्याम सोनारे,प्रांताध्यक्ष ,उद्योग सेल यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. 

तसेच उद्योग सेल नविन जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती ही  करण्यात आली.  त्यावेळी आपले मनोगत वेक्त करताना प्रतिभा कांबळे-तायडे म्हणाल्या जुन्या उद्योगांना पुनर्जीवित करण्या करिता  प्रयत्न करणार आणि आजारी उद्योगांना आधार देऊन नवीन उभारणी देणे. तसेच मी उद्योजक होणार  हा कार्यक्रम युवक-युवती साठी राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

   या कार्यक्रमाला पिं.चिं शहर लीगल सेल अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, शहर कॉंग्रेस उपाध्यक्ष दिलीप पांढरकर, मकरध्वज यादव, विशाल कसबे, वाजिद कमालि, हिरामण खवळे, राकेश राजेगावकर, अरविंद कांबळे, मुनसफअली एम खान, प्रतीक जगताप आदी मान्यवर व प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post