मु्स्लिम समाज सुधारण कार्यकर्मांची पिंपरी चिंचवडमध्ये मालिका जमियेत उलमा हिंद हाजी ग़ुलज़ार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात् येत आहे.प्रेस मीडिया लाईव्ह :

   अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड दी. 29 चिंचवड गावातील मस्जिद मध्ये इसलाहे-माशरा अर्थात् समाज सुधार  या धोरणा आंतरगत एक सभा  जमियेत उलमा हिंद यांच्या मार्गदर्शनाखाली अयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हाजी ग़ुलज़ार, अध्यक्ष पिं. चिं. जमियेत.., कारी ईकबाल मदरसा फैजुल् उलुम् दापोडी, शेख मौह्योद्दीन आर्.टि.आय   अध्यक्ष पुणे, मौलाना फिरोज़ काळेवाडी, ईमरान पानसारे चिंचवड मस्जिद चे विश्वस्थ आदि मान्यवर उपस्तित् होते.

समाजसुधार कार्यक्रमांतर्गत शिक्षा, रोजगार ,आरोग्य, आणि व्यसनमुक्ती, हिंदू मुस्लिम एकता, राष्ट्रप्रेम, सामाजिक आणि राजकीय उन्नतीसाठी समाजाचे कर्तव्य, अशा अनेक विषयांवर व्याख्याने,चर्चासत्रे आयोजित करून समाजामध्ये जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन हाजी गुलजार यांनी त्यावेळी केले,शेख मौह्योद्दीन अध्यक्ष अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार असोशियन, यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार प्रकट केले तसेच जमियेत उलमा हिंद यांचे कार्य समाज आणि देशासाठी हितकारक आहे म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिमांनी या संस्थेसाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत इमरान पानसरे विश्वस्त चिंचवड मस्जिद ट्रस्ट, यांनी केले    

Post a Comment

Previous Post Next Post