वाय सी एम हॉस्पिटल मध्ये आंधळा कारभार

  शव शवविच्छेदनानंतर मृत्यू देहच गायब.. नातेवाईकांचा संताप

 प्रेस मीडिया लाईव्ह 

अनवर अली शेख :

 पिंपरी येथील  वाय सी एम रुग्णालय येथे शवविच्छेदनानंतर मृत्यू देह  गायब  झाल्याची अजब घटना घडली, स्नेहलता यांच्या मृत्यूदेहाचे  मध्यरात्री दीड वाजता विच्छेदन करण्यात आले परंतु त्यांचे नातेवाइक गुजरात येथून येत असल्याने त्यांच्यावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले. मृतदेह घेऊन जाताना तो मृतदेह स्नेहलता यांचा नाही हे नातेवाइकांच्या लक्षात आले. नातेवाइकांनी शवविच्छेदनगृहात जाऊन पाहणी केली असता स्नेहलता यांचा मृतदेह तेथे नसल्याचे उघड झाले.

रुग्णालयाच्या हलगर्जीच्या कारभारामुळे दुसराच मृतदेह नातेवाईकांना दिले त्यामुळे  नातेवाईक आणि परिजनांनी संताप व्यक्त करत रुग्णालयामध्ये तोडफोड केली, पोलीस प्रशासनाने तात्पर्य दाखवत परिस्थिती वर कंट्रोल करण्याचे अति महत्त्वाचे काम केले.

 स्नेहलता अशोक गायकवाड (वय 57, रा. दापोडी) यांच्या अंगावर मंगळवारी सायंकाळी भिंत कोसळली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना सुरुवातीला औंध येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी स्नेहलता गायकवाड यांचा मृतदेह पिंपरी येथील "वायसीएम' शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आला होता. 

Post a Comment

Previous Post Next Post