कोल्हापुरात सोय सुविधांचा उडाला बोजवारा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा असलेल्या कोल्हापुरात सोय सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. शहरातील निम्म्याहून अधिक रस्त्यात गुडघाभर खड्डे पडले असून महानगरपालिका आणि प्रशासनाचे या रस्त्यांकडे लक्ष नाही आहे आणि याचमुळे याच महानगरपालिकेतील एका मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या अभियंत्याच्या आईचा खड्ड्यात पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासन आणखी किती जीवाची बळी देणार असा सवाल कोल्हापूरकर विचारत आहेत.


कोल्हापूर शहरातील रस्त्यांची पाक चाळण झालेली पाहायला मिळत आहे. आणि याच रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले असून यातून वाहतूक करणाऱ्यांनी आपला जीव मुठीत घेऊन आपले वाहन चालवत असतात. याकडे महानगरपालिकेचा अक्षम्य दुर्लक्षपणा होत आहे. आपटेनगर परिसरात अशाच एका खड्ड्यात कोल्हापूर महानगरपालिकेत उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या एका अभियंत्याच्या निष्पाप आईचा खड्ड्यात पडून जागीच जीव गेला आहे. महानगरपालिकेच्या या अभियंत्याला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने आपल्या आईचा जीव गेलाने चांगलाच मानसिक धक्का बसला आहे. दिवाळीच्या तोंडावरच हसत्या खेळत्या घरातील आई अशा पद्धतीने निघून गेल्याने अभियंत्यासह कुटंबियाना अद्याप ही या घटनेवर विश्वास बसत नाही. अपघात झाल्यानंतर महापालिकेने ज्या खड्ड्यात अंभियंत्याच्या आईचा जीव गेला तो मुरुम टाकून बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रयत्न केला आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सोयी सुविधांचा बोजवारा उडाला  आहे. कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात तसेच येथील अनेक प्रेक्षणीय स्थळांना पर्यटक भेट देत असतात यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा जिल्हा सोयी सुविधांच्या बाबतीत मात्र मागे पडला आहे. पर्यटक शहरात दाखल होताच तावडे हॉटेलच्या कमानी पासूनच खड्डे सुरू होतात. ताराराणी चौक, व्हीनस कॉर्नर,दसरा चौक,बिंदू चौक या महत्त्वाच्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत शिवाय शहरातील निम्म्याहून अधिक रस्ते खड्डेमय झाले आहेत याकडे महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचा अक्षम्य दुर्लक्षपणा सुरू आहे. एका बाजूला पालकमंत्री दीपक केसरकर हे कोल्हापुरात आले की पर्यटनाच्या दृष्टीने नेहमीच कोल्हापूरला पुढे नेण्याचे बोलत असतात मात्र त्याच पर्यटकांना कोल्हापुरात आल्यावर योग्य त्या सोयीसुविधा मिळत नसतील तर पर्यटक कोल्हापुरात का येतील असा प्रश्न निर्माण होत आहे..

रस्त्यांबाबत एखादा जनआंदोलन किंवा याबाबत प्रशासनास जाब विचारले असता प्रशासनाच्यावतीने शहरातील काही मार्गावर पॅचवर्क करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येतो. मात्र हे पॅचवर देखील अत्यंत प्रयत्न असतात त्यामुळेच पॅचवर्क केल्यानंतर काही दिवसात असते उघडण्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी नव्याने रस्ते करण्यात आले आहेत मात्र तेथे देखील महानगरपालिकेच्यावतीने पाईप टाकण्यासाठी किंवा अन्य कामासाठी नवीन रस्ते खोदण्याचा पराक्रम सुरू असतात. त्यामुळे महापालिकेत नेमकं काय चाललं आहे याचाच अंदाज लावणे कठिण आहे.

Post a Comment

Previous Post Next Post