संतोष आठवले ( कांबळे ) यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ प्रांतकार्यालया समोर पॅथर आर्मीचे निदर्शने

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी प्रतिनिधी :  पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना राष्ट्रीय महासचिव संतोष एस .आठवले ( कांबळे ) यांच्यावर नवे दानवाड येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पॅंथर आर्मी स्वराज संविधान रक्षक सेना संघटनेच्या वतीने इचलकरंजी प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने धरणे आंदोलन करण्यात आले


 नवे दानवाड ता . शिरोळ येथिल अवैद्य विषारी गावठी दारू व मटका बंद न झाल्यास ईच्छा मरणाची परवाणगी मिळावी अशी मागणी पत्रकार संतोष आठवले ( कांबळे ) यांनी महाराष्ट्र राज्य शासनाकडे केली होती ईच्छा मरणाच्या मागणीची दखल स्थानिक प्रशासनाने घेऊन नवे दानवाड गावाती विषारी गावठी हातभट्टी दारु मटका आदी बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याची भुमिका घेतली होती तसेचे खोट्या ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद होऊ नये याचीही मागणीचे निवेदन पोलिस अधिक्षक कार्यालय , कोल्हापूर यांच्या कडे  केली होती .खोट्या ॲट्रॉसिटी बद्दल व गावातील विषारी गावठी हातभट्टी दारू , मटका कायमस्वरुपी बंद व्हावी अन्याथा ईच्छा मरणाची परवाणगी मिळावी या मागणी साठी आंदोलनात्मक भुमिका संतोष आठवले यांनी घेतल्या बद्ल कोल्हापूर जिल्ह्यातील स्वयंघोषित नेता सतिश मधूकर माळगे, कांबळे ( रा. इंद्रजीत कॉलनी ,मणेर मळा उचगांव ता .करवीर जि. कोल्हापूर ) यांच्या ईशारा वर काम करणारा रणजित रावसो कांबळे रा .नवे दानवाड यांनी  संतोष आठवले यांना गावातील अवैद्य विषारी गावठी हातभट्टी दारु व मटका बंद का करतो या कारणावरुन रसत्यावर गाडी अडवून लाथा बुक्यांनी मारहाण केली या घटने चा पँथर आर्मी वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला

संतोष आठवले ( कांबळे . ) यांच्यावर प्राणघातक हल्ला करावयास लावणारा स्वंय घोषीत जिल्हा नेता सतिष मधूकर माळगे ( रा. उचगांव ता .करर्वार )व त्याला साथ देणारे रावसो कांळीगा कांबळे, रितेश रावसो कांबळे , सुनिल काळीगां कांबळे शुभम सुनिल कांबळ सर्व रा .नवे दानवाड ता . शिरोळ जि. कोल्हापूर यांच्या वर कडक कारवाई करून तात्काळ अटक या मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेना जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्यावतीने इचलकरंजी प्रांत अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले

 या आंदोलनाचे नेतृत्व सौ . चंदाताई पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,सौ बानूबी पठाण,कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ,फिरोज मुजावर जिल्हाध्यक्ष, त्रिंबक दातार जिल्हा कार्याध्यक्ष कोल्हापूर ,हरूण मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष, श्रीमती कविता कांबळे तालुका अध्यक्षा हातकलंगले यांनी केले यावेळी नायब तहसिलदार संजय काटकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले, नवे दानवाड गावचे लोकनियुक्त सरपंच श्रीमती वंदना हरिचंद्र कांबळे उपसरपंच कमल सुखदेव कांबळे ,पत्रकार डी एस डोने कुरुंदवाड चे डॉक्टर एस के माने ,महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषदेचे सरचिटणीस प्रा . अशोक कांबळे, भीमशक्ती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्राध्यापक देवेंद्र कांबळे, एडवोकेट राहुल हरिश्चंद्र कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे , आरपीआय महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रदीप कांबळे, डीपीआय  चे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नजीर डफेदार, आझाद समाज पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तौफिकभाई किल्लेदार ,दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष हुसेन मुजावर ,पॅंथर आर्मी सांगली जिल्हा अध्यक्ष अजित सगरे ,पॅंथर आर्मी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष उमेश सुतार , सुरेश कांबळे खोतवाडी ,सौ सारिका कांबळे कबनूर ,गौतम कांबळे, बीबी मकानदार ,विद्याताई झेंडे, राजेंद्र मोहिते, मुस्तफा सय्यद ,रिजवान शेख तारदाळ, शैना ज सय्यद तारदाळ खोतवाडी माजी ग्रामपंचायत सदस्य अजित सोळसे, सौ लक्ष्मी कांबळे दानवाड ,बाळासो कांबळे अभिषेक कांबळे ,संजय कांबळे अझरुद्दीन मकानदार ,यासीन देसाई नवे दानवाड गावचे ज्येष्ठ नागरिक रामा बेरड व काशाप्पा कांबळे आदीच्यासह मोठ्या संख्येने पॅंथर आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post