संस्कार शिदोरी मंच आयोजित कोल्हापुरातील सर्वात मोठी गोधडी अर्पण सोहळा' संपन्नप्रेस मीडिया लाईव्ह :

बानू नदाफ :

नागपूर चला सख्यांनो, चला सख्यांनो...प्रशिक्षणासोबत उपक्रम हा सर्वात सुंदर मोठ्या गोधडीचा, साथ तुमची या उपक्रमाला आईअंबाबाईच्या सेवेला... या घोष वाक्यानुसार मागील वर्षी नवरात्रीमध्ये सुरू झालेल्या महागोधडी उपक्रमाला या नवरात्रीत वर्ष पूर्ण होत आहे. आता पर्यंत जवळजवळ १ हजार महिलांच्या सहभागातून, विणकामातून २१फूट बाय २१ फूट आकाराची महागोधडी पूर्ण झाली आहे. ही महागोधडी ३० तारखेला आंबाबाईच्या सेवेशी देवस्थान समिती सचिव शिवराज नायकवडे यांच्याकडे वाजत गाजत झांझ, लेझीम पथकच्या शोभयात्रेतून करण्यात आली.महागोधडी सोबत कुंकुमार्चन सोहळा संपन्न झाला. 

दिवसभर ही गोधडी सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली. यादरम्यान अनेक मान्यवरांनी गोधडी उपक्रमाला सदिच्छा भेट दिल्या. त्यानंतर ४ वाजता महा गोधडी अर्पण शोभायात्राची सुरूवात माजी महापौर सई खराडे, महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी अंजली दळवी यांच्या हस्ते करण्यात  आली. ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी मंदिर ते मिरजकर तिकटी ते पश्चिम दरवाजा पर्यंत काढण्यात आली. नंतर ती देवस्थान समिती सचिव शिवराज नायकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. स्मिता खामकर, अध्यक्ष-संस्कार शिदोरी मंच यांनी यावेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post