अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे चा उल्लेखनीय उपक्रमप्रेस मीडिया लाईव्ह :

शाहूवाडी: दिवाळी सण म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचा आणि उत्साहाचा सण आपण सारे जण हा सण उत्साहात साजरा करतो पण समाजातील काही उपेक्षित घटक या पासून वंचित राहतो आणि याच उपेक्षित घटकांसाठी या दिवाळीत काहीतरी करावे ही सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या बरोबर सर्वांचीच दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे कडून 'मायेची दिवाळी, सर्वांची दिवाळी ' या उपक्रमा अंतर्गत मदतीचा हातभार लावण्यात आला. 


महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागा अंतर्गत प्रथम धागा महिला निवारा, एकटी संस्था, लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथील वयोवृद्धांना नवीन कपडे, साड्या, प्रापंचिक साहित्य आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.  महाविद्यालयाच्या स्टाफ कडून  त्यांना आधार देत तब्बेतीची विचारपूस आपलेपणाने केली. भेट वस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमास धागा निवारा आणि एकटी संस्थेच्या सौ. पुष्पा कांबळे यांचे सहकार्य लाभले.

यानंतर दुपारी महाविद्यालया कडून शाहूवाडी येथील केंद्रीय अनुसूचित जाती अंतर्गत प्राथ. / माध्य. निवासी आश्रमशाळा, शाहूवाडी येथे भेट देण्यात आली. दिवाळी निमित्त या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नवीन कपडे आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. परिस्थितीने अनाथ केलेल्या या चिमुकल्यांना एक मायेची आणि प्रेमाची ऊब मिळावी आणि या चिमुकल्यांची दिवाळी तितक्याच आनंदात आणि उत्साहात साजरी  व्हावी या उद्देशाने महाविद्यालया कडून भेट देण्यात आली. यावेळी शाळेतील मुलांसोबत स्टाफ ने गप्पा मारल्या, त्यांची विचारपूस केली आणि यावेळी मुलांनी समूहगीत आणि गाण्याचे सादरीकरण केले. या साठी आश्रमशाळेचे श्री. दीपक बुचडे सर आणि सौ. बुचडे मॅडम यांचे सहकार्य लाभले .

या उपक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे योगदान लाभले. सामाजिक कार्यकर्त्या सौ. मेघा जाधव यांच्या द्वारे सदर संस्थांची माहिती मिळाली.

हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक मा. श्री. विजयसिंह माने साहेब, जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. मनीषा विजयसिंह माने वहिनी आणि प्राचार्य डॉ. अभिजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखाली राबविण्यात आला. 

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित श. कुलकर्णी, प्रा. सुनील कराळे, प्रा. राहुल कांबळे, प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कोमल कांबळे, प्रा. अनुजा कांबळे, प्रा. पल्लवी जगताप, श्री. नितीन सावंत, श्री. अनिल पाटील, श्री. महेश कुंभार आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post